Goa Traffic Issue: रुग्‍णवाहिकाही खोळंबताहेत कोंडीत; वाहतुक कोंडीची समस्या कायम

Goa Traffic Issue: वाहतुकीचा फज्जा : पार्किंग व्‍यवस्‍थेचे तीनतेरा; शिस्‍तीचा अभाव हेच प्रमुख कारण
Goa Traffic Issue
Goa Traffic Issue Dainik Gomantak

Goa Traffic Issue : `काणकोण हा शेतीप्रधान तालुका म्हणून कधीकाळी सुप्रसिद्ध होता. मात्र नंतर अनेक कारणांमुळे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवू लागले. बदलत्या काळानुरूप पर्यटन व्यवसायाशी निगडित काम-धंदे करण्याला ते प्राधान्‍य देऊ लागले. परंतु पर्यटन व्यवसायामुळे अनेक समस्या या ठिकाणी आ वासून उभ्या राहिल्या आहेत.

Goa Traffic Issue
Rohan Khuante: हरित पर्यटनासाठी स्वच्छता महत्त्वाची

पार्किंगची समस्या तर खूपच मोठी आहे. अनेकदा तर रुग्‍णवाहिकासुद्धा वाहतुकीच्‍या कोंडीत अडकून पडण्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. काणकोण कदंब बसस्थानक ते प्रशासकीय इमारतीपर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.

काणकोणच्या प्रशासकीय इमारतीजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने पार्क करावी लागतात. सरकारी कर्मचारी व कामासाठी येणारे नागरिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्‍यामुळे वाहतूक पोलिसांची मात्र दमछाक होत असते. रस्त्यावर वाहने पार्क करून काहीजण वाहतुकीच्‍या कोंडीत भर टाकत आहेत.

Goa Traffic Issue
Goa Garbage Issue: कचऱ्यावर दरवर्षी 100 कोटी अतिरिक्त खर्च

पर्यटन क्षेत्रात सध्या काणकोण आघाडी घेत आहेत. आगोंद, पाळोळे, पाटणे, खोला या समुद्र किनाऱ्यांबरोबरोच पर्यटन ग्राम म्‍हणून केंद्रीय पुरस्कार प्राप्त खोतीगाव, तसेच हरित व स्वच्छ पंचायत पुरस्कारप्राप्त आगोंद आदी गावांना देशी-विदेशी पर्यटक रेंट अ कार, बाईक किंवा स्वतःच्या वाहनांनी भेट द्यायला येत असतात. आधीच अरुंद रस्ते व वाहनतळाची कमतरता, यामुळे पार्किंगचा प्रश्न आणखी गंभीर बनत चालला आहे.

पार्किंगसाठी जागाच नाही

प्रशासकीय इमारतीमधील मामलेदार कार्यालय, कृषी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे कार्यालय, नागरीपुरवठा कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच अबकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या लोकांना वाहने पार्क करण्‍यासाठी जागाच नाही.

कदंब बसस्थानकासमोरची रस्त्याच्या बाजूची जागा विक्रेत्यांच्या मालवाहू वाहनांनी व्यापलेली असते. त्‍यामुळे खासगी वाहने पार्क करण्यास मोठीच अडचण होते. काणकोण पालिकेने वेळीच पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात या ठिकाणी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार हे निश्‍चित.

समस्‍येवर उपाय गरजेचा

काणकोणातील स्थानिक लोकही मोठ्या संख्‍येने वाहने वापरत आहेत. टपाल कार्यालय, गोवा बागायतदार, स्टेट बँक ऑफ इंडिया, मासळी मार्केट आणि परिसरात तर वाहनांची गर्दी नित्‍याचीच बनली आहे. अनेकदा रुग्णवाहिकाही या वाहतुकीच्‍या कोंडीत अडकून पडतात. वाहनतळच नाही तर वाहने पार्क तरी कोठे करायची, असा प्रश्‍‍न उपस्‍थित करून त्‍यास जबाबदार असलेली यंत्रणा मात्र एकमेकांच्या नावाने बोटे मोडत आहे. दूरदृष्टी ठेवून हा प्रश्न आत्ताच सोडवणे अत्यावश्यक बनले आहे, अन्‍यथा त्‍याचे परिणात भविष्‍यात भोगावे लागतील, हे निश्‍चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com