Agriculture News : पेडणे तालुका हा कृषी प्रधान तालुका आहे. तालुक्यातआतापर्यंत भाताचेच मोठ्याप्रमाणात उत्पन्न होत आले तरी भात शेती बरोबरच शेतकऱ्यांनी व्यावहारिक दृष्टीकोन ठेवून विविध पिके घेऊन शेती करावी,
असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथे बोलताना केले. पेडणे तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वार्षिक सभेत ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन उदय प्रभुदेसाई,उप संचालक दिलीप नारुलकर ,संचालक ॲड. सिताराम परब ,मिलिंद तळकर, प्रमिला साळगावकर आदी मान्यवर होते.
पार्सेकर म्हणाले, की कृषी क्षेत्रात सामान्य शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. सरकारने शेतकऱ्यांना सहकार्याचा हात द्यायला हवा. नारळाच्या काथ्या व अन्य भागाचा उपयोग करुन नारळांना व अशाच प्रकारे अन्न उत्पादनाला वाढीव रक्कम देणे शक्य आहे. पेडणे तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून शेतकऱ्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. त्या ही संस्था पूर्तता करेल, अशी अपेक्षा आहे.
संस्थेचे चेअरमन उदय प्रभुदेसाई म्हणाले की, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काजू बिया, ऊस, कोकम आदी उत्पन्नावर येथेच प्रक्रिया करणे, दर्जेदार गावठी भाजीपाल्याचे उत्पन्न घेणे, असे उपक्रम राबविण्यात येतील.
शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल यावर उपाययोजना केली जाईल पेडण्यात उपलब्ध नसलेली शेती संबंधित अवजारे व औषधे संस्था उपलब्ध करून देईल.नाबार्ड कडून २,४५,५०० रुपये व १,४५,५०० रुपये अनुदान मिळाले आहे.उमा प्रभुदेसाई स्वागत केले. ॲड. सिताराम परब यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
चोन्साय - पार्से येथे पडीक शेतीत सामूहिक शेती राबवण्याबाबत आमची शेतकऱ्यांशी बोलणी झालेली आहेत. एका वर्षानंतर शेतकऱ्यांना आमची पद्धत आवडल्यास शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार पुढचा निर्णय घेऊ. पाच हजार एकर जमिनीत देशी हळदीची लागवड करणार आहोत.
-उदय प्रभुदेसाई, चेअरमन
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.