Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेसचा 'चालढकल'पणा! युतीची वाट आम्ही कधीपर्यंत पाहायची? वीरेश बोरकर यांचा सवाल

Goa ZP Election: 'आरजी' पक्षाचे कार्य राज्यभर आहे. युतीसंबंधी आम्ही अनेक बाबीत माधार घेतली; परंतु आता निवडणूक जवळ आली असताना काँग्रेसचे युतीविषयी उद्या निर्णय घेऊ हेच सुरू आहे.

Sameer Amunekar

पणजी: 'आरजी' पक्षाचे कार्य राज्यभर आहे. युतीसंबंधी आम्ही अनेक बाबीत माघार घेतली; परंतु आता निवडणूक जवळ आली असताना काँग्रेसचे युतीविषयी उद्या निर्णय घेऊ हेच सुरू आहे. काँग्रेसची युतीसंबंधी वाट कधीपर्यंत पाहायची? असा प्रश्न निर्माण झाला असून आम्ही उमेदवार का जाहीर केले? अशाप्रकारचा निर्णय आम्हाला का घ्यावा लागला? याची माहिती आम्ही लवकरच माध्यमांना देऊ. असे 'आरजी'चे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.

सांताक्रुझ, लॉरेन्स, चिंबल येथील 'आरजी'च्या 'झेडपी' उमेदवारांचे अर्ज भरल्यानंतर बोरकर माध्यमांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे उमेदवार तृप्ती बकाल, दीपिका काणकोणकर, इस्पेका ब्रागांझा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, बोरकर म्हणाले की, इतर विरोधी पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले. काही अपर्णाना पाठिंबा देत त्यांनी सर्व मतदारसंघांत आपले उमेदवार दिले आहेत. असे असताना प्रचार करण्यासाठी आवश्यक वेळेची गरज आहे.

त्यामुळे काल १२ आणि आज १४ असे एकूण २६ उमेदवार आम्ही जाहीर केले असून जनता सांताक्रुझ, लॉरेन्स, चिंबल येथील 'आरजी'च्या 'झेडपी' आम्हाला साथ देणार असल्याचा विश्वास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Controversy: पाकिस्तानी खेळाडूला ICC चा दणका! मैदानावरील गैरवर्तनाबद्दल ठोठावली कठोर शिक्षा Watch Video

Goa Accident: थिवीत भीषण अपघात, बाईकस्वार गंभीर जखमी

Goa ZP Election 2025: जि.पं. निवडणुकीसाठी काँग्रेसची 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; सामाजिक समीकरण साधत 'वादग्रस्त' सांताक्रूझ जागेवर केला दावा

'पढ़ना है तो इस्लाम अपनाओ...', पाकिस्तानात हिंदू विद्यार्थ्यांचा छळ, सिंधमधील धक्कादायक प्रकार

IND vs SA, Playing XI: तिसऱ्या वनडेमध्ये कोणाची एन्ट्री, कोणाची एक्झिट? अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग-11

SCROLL FOR NEXT