Viresh Borkar
Viresh Borkar dainik gomantak
गोवा

Goa Assembly Election 2022: गोव्यात 'आरजी' ची एंन्ट्री वाढवू शकते अनेकांची डोकेदुखी

दैनिक गोमन्तक

मडगाव : राज्याच्या राजकारणात काँग्रेस, भाजप, मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी हे पक्ष विधानसभा 2022 च्या निवडणूकीच्या रणागंणात होते. ज्यात भाजपने बाजी मारत 20 जागा आपल्या ताब्यात घेतल्या. तर 40 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसला केवळ 11 जागा मिळाल्या. तर पहिल्यांदाच आपले राजकीय भवितव्य पणाला लावत आम आदमी पार्टीने 2 जागांवर विजय मिळवला. अशा पद्धतीने गोव्याचा राजकीय निकाल हाती येत असतानाच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडली. ज्यामुळे गोव्याच्या राजकारणार खळबळ उडवून दिली. गोव्याच्या राजकारणार पहिल्यांदाच आरजीने आपले खाते उघडले. आपला पहिला आमदार काँग्रेसच्या बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या सासष्टी तालुक्यातून विजयी झाला. त्यामुळे आरजीचे उमेदवार एक 'सरप्राईज पॅकेज' म्हणून गोव्याच्या राजकीय पटलावर उमटून आला. तसेच या तालुक्यातील 8 मतदारसंघातून त्यांनी पाहिल्याच विधानसभेत (Legislative Assembly) 12.48 टक्के मते मिळविली आहेत. त्यामुळे गोव्याच्या राजकारणार आरजी नवीन ताकद बनण्याच्या वाटेवर आहे. (RG new option for Congress in Goa politics)

आरजीने (Revolutionary Goans Party) आपल्या प्रचारात स्थानिकांच्या हक्काचा रोजगार आणि परप्रांतीयांना विरोध हे दोन मुद्दे घेतले होते. ज्यामुळे गोव्याच्या (goa) राजकारणार पहिल्यांदाच आरजीने आपला पहिला आमदार दिला. त्यामुळे काँग्रेसला पक्षाला (Congress) एक सक्षम पर्याय म्हणून तो पुढे येत आहे. या निवडणुकीत असे यश प्राप्त झाल्याने येत्या दोन महिन्यात होणाऱ्या पंचायत निवडणुकीत या पक्षाने आपले उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

सासष्टीत (Salcete) एक मडगाव मतदारसंघ वगळता अन्य सातही मतदारसंघात या पक्षाची कामगिरी चमकदार झाली आहे. ज्यामुळे तरुणांची ताकद अशा स्वरूपात तो पुढे येऊ लागली आहे. विशेषतः नुवे, वेळ्ळी, बाणावली व कुडतरी या ख्रिश्चन बहुल मतदारसंघात त्यांना मिळालेला पाठिंबा लक्षवेधी आहे.

नुवे मतदारसंघात या पक्षाचे अरविंद डिकॉस्ता यांनी कमाल करत 4338 मते मिळवित चक्क दुसरा क्रमांक पटकावला. या मतांची एकूण टक्केवारी 19.93 टक्के एव्हढी प्रचंड आहे. बाणावली मतदारसंघात (Banavali constituency) आरजीच्या डेसमंड फेर्नांडिस याने 18.25 टक्के मते मिळवीत आपली मतांची संख्या 3854 वर पोहोचवली जी चौथ्या क्रमांकाची कामगिरी ठरली आहे. कुडतरी मतदारसंघात (Kudtari constituency) आरजीच्या रुबर्ट परेरा याने तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी करताना 3489 मते घेतली ज्यांची टक्केवारी 15.58 टक्के आहे तर वेळ्ळी मतदारसंघात आरजीच्या डेगली फेर्नांडिस याने 3653 (15.62 टक्के) मते मिळवीत चौथे स्थान मिळविले. विद्यमान आमदार (MLA) फिलिप नेरी फेर्नांडिस यांनाही त्यांनी मागे टाकले आहे.

सासष्टीतील कुंकळ्ळी, नावेली, मडगाव व फातोर्डा हे चार मतदारसंघात हिंदू (Hindu) मते ख्रिस्ती (Christian) मतापेक्षा अधिक आहेत, असे जरी असले यातील तीन मतदारसंघात आरजीची कामगिरी चांगली आहे. कुंकळ्ळीत विल्सन कार्डोज याने 2430 (10.52 टक्के), नावेलीत बेंतो डिसिल्वा याने 2086 (9.58 टक्के), फातोर्डा येथे नवख्या वलेरी फेर्नांडिस हिने 1556 (6.44 टक्के) मते मिळविली. फक्त मडगाव मतदारसंघात त्यांच्या शशिराज शिरोडकर याला सर्वात कमी म्हणजे 722 (3.19 टक्के) मते मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT