Goa Assembly Sessions Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Sessions:...म्हणून आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सभागृहाबाहेर काढले

विधानसभेत म्हादईप्रश्नी मांडलेल्या ठरावावर आज हिवाळी अधिवेशनात सुरू झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

विधानसभेत म्हादईप्रश्नी मांडलेल्या ठरावावर आज हिवाळी अधिवेशनाच्या (Goa Assembly Winter Session) शेवटच्या दिवशी गरमागरम चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आरजी आमदार वीरेश बोरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लिहलेले पत्र वाचत असताना त्यांची परवानागी नाकारण्यात आली. यामुळे बोरकर सभातींच्या आसनाकडे धावले, यावेळी सभापतींच्या सूचनेवरून त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान, सत्ताधारी आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांचे म्हादईप्रश्नी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत, सर्व आमदार त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी वीरेश बोरकर (MLA Viresh Borkar) यांना सभागृहाबाहेर काढल्याप्रकरणी भाजपवर टीका केली आहे. "वीरेश बोरकर यांनी भाजपचे मंत्री आणि आमदार यांना सभागृहात नियमांची शिकवण दिली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढले. भाजपने त्यांना बोलू दिले नाही, भाजप उघडे पडेल याची त्यांना भीती वाटते. डबल इंजिन एका आमदारामुळे रूळावरून घसरले आहे." असे मनोज परब (Manoj Parab) यांनी म्हटले आहे.

विरोधक आपला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्न करताहेत - विश्वजीत राणे

म्हादईवरून विधानसभेमध्ये काही काळ राडा झाल्यानंतर वनमंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की गोव्याच्या राजकारणामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की विरोधक मुद्दा सोडवण्याऐवजी त्या मुद्द्याचे राजकारण करत स्वतःचा स्वार्थ साधत असतात.

म्हादईसाठी आमचे सरकार सतत कार्यरत आहे. ज्या वेळेला सरकारने चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली त्यावेळेला कोणीही विरोधक बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. जर तुम्हाला खरंच नागरिकांची आणि गोव्यातील प्रश्नांची चिंता आहे तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना मदत करून हे विषय सोडवण्यासाठी हातभार लावा, असा घणाघात विश्वजित राणे यांनी केला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT