Mahadayi Water Dispute: कर्नाटकने म्हादईच्या उपनद्या कळसा-भांडुरावर धरणे उभारून पाणी वळवण्याच्या डीपीआरला मंजुरी मिळवली असल्याने गोव्याची बाजू कमकुवत झाली आहे, अशा परिस्थितीत गोव्याची म्हादई वाचवण्याची असल्यास गोवा सरकारने म्हादई अभयारण्य हे व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित करावे,
यासाठी लोकप्रतिनिधींनी पर्यावरण अभ्यासकांचे मार्गदर्शन घ्यावे, असे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
म्हादई संरक्षित करायची असल्यास म्हादई अभयारण्य क्षेत्र हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करावे, जेणेकरून व्याघ्र प्रकल्पातून वाहणारा पाण्याचा प्रवाह अडवता येणार नाही, हा मुद्दा न्यायालयात गोव्याची बाजू भक्कम करील.
म्हादई नदी ही अभयारण्य क्षेत्रातून वाहते. या भागात दुर्मीळ अशा जैविक संपत्ती आढळत असून निसर्ग चक्रातील महत्त्वाचा असलेला पट्टेरी वाघांचे सुरक्षित वस्ती आहे, अशी माहिती केरकरांनी विविध सभांतून देत आहेत. त्यांचा याबाबत मार्गदर्शन घेऊन लोकप्रतिनिधींनी लढले पाहिजे, असे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.
पश्चिम घाट युनेस्को यादीत
पश्चिम घाट आणि पर्यायाने गोव्याचे जंगल हे जगातील अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडते. तेव्हा अशा या जंगल क्षेत्राचा समावेश युनेस्कोच्या ''वर्ल्ड वारसा क्षेत्र'' म्हणून समावेश केल्यास त्याचा फायदा गोव्याची जीवनदायिनी वाचण्यात होईल.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पश्चिम घाटाचा समावेश जगातील वारसा स्थळात केलेला आहे, पण गोवा सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. तेव्हा सरकारने हे क्षेत्राचा युनेस्कोच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.