Goa Assembly Session Last Day: 'म्हादई'वरील चर्चेसह, शेवटच्या दिवशी विधानसभेत काय घडलं? जाणून घ्या

आज विधानसभा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.
Goa Assembly 
Session Last Day
Goa Assembly Session Last DayDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याच्या विधानसभेत अनेक विषयांची रंगतदार मेजवानी पाहायला मिळाली. या मेजवानीचा आस्वाद घेतल्यावर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आराम केल्याचे चित्र दिसून आले.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकात 'म्हादई'विरुद्ध जर आवाज उठवला, तर मी भाजपमध्ये प्रवेश करेन : आमदार विजय सरदेसाई

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समिती स्थापन केली आहे. यात विजय सरदेसाई यांच्यासह वीरेश बोरकर, कार्लुस फरेरा व इतर नेत्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले म्हादईसाठी सर्व कायदेशीर लढाई लढण्यास आम्ही सज्ज आहोत. विरोधकांनी देखील यासाठी एकत्र यावे असे अवाहन त्यांनी केले.

विरोधीपक्षनेते युरी आलेमाव म्हादई प्रस्तावावर बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असे म्हणत आपल्या भाषणाची सुरूवात केली. म्हादई आपली आई आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य आणि केंद्राची भूमिका काय ? याचे उत्तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेला द्यावे

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे म्हादई प्रस्तावावर मराठीत भाषण

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हादई प्रस्तावावर आपल्या भाषणाची सुरूवात मराठीत केली. मी मराठीत बोलू का, कळते ना सर्वांना असे ढवळीकर यांनी सभागृहाला विचारले. सर्वांनी होकार दिल्यानंतर त्यांनी मराठीत भाषण केले. ढवळीकरांनी म्हादई म्हणजे आपली आई असे म्हणत म्हादईवर एक कविता सादर केली.

'प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सुंदर म्हादई आई' अशा आशयाची कविता सुदिन ढवळीकर यांनी सादर केली.

सर्व चाळीस आमदरांनी राजीनामा देऊया - विजय सरदेसाई

कर्नाटकातील सर्व राजकीय पक्ष म्हणतात म्हादई वळवा, आणि गोव्यातील सर्व राजकीय पक्ष म्हणतात म्हादई वाचवा. म्हादईला वाचविण्याची लढाई बंद झाली नाही तर ती सुरू झाली आहे.

देशातील एक छोटे राज्य काय करू शकते हे देशाला दाखवून देऊया, म्हादईवर तोडगा निघत नसेल तर, सर्वच्या सर्व 40 आमदारांनी राजीनामा देऊया.

राज्यपालांवर टीका करणारे आज कोठे आहेत - मंत्री सुभाष फळदेसाई

म्हादईबाबत राज्यपालांनी आपल्या भाषणात उल्लेख केला नाही म्हणून गोंधळ घालणारे आत्ता चर्चा सुरू असताना कोठे आहेत. असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.

म्हादईचा लढा जिंकण्यासाठी उत्तम वकीलांची फौज तयार करून गोव्याची बाजू मजबूतपणे मांडतील.

प्रत्येक पक्षकडून म्हादई प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न - लोबो 

कर्नाटकमध्ये पाहिले तर सर्व राजकीय पक्ष म्हादई वरून एकत्र आल्याचे दिसते, पण गोव्यात मात्र असे नाही. कर्नाटकच्या एका जिल्ह्या एवढा असलेल्या गोव्यात 40 आमदार आहेत पण, ते एकत्र नाहीत. प्रत्येकाकडून म्हादई प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केला.

दिनेश गुंडूराव पळून गेले - संकल्प आमोणकर 

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी म्हादईवर बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल केला. गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव यांची हकालपटट्टी केली नसून ते पळून गेले आहेत. कारण काँग्रेसला आगामी कर्नाटक निवडणूकीत म्हादईच्या प्रश्नावर राजकारण करायचे आहे. असे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आमदार संकल्प आमोणकर म्हणाले.

अन् सभापतीच्या आसनाकडे गेलेल्या आमदार वीरेश बोरकर यांना सभागृहातून बाहेर काढले.

सभागृहात म्हादईवर चर्चा सुरू असताना आमदार वीरेश बोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेले पत्र वाचण्यास सुरूवात केली. दरम्यान, सभापती रमेश तवडकर यांनी बोरकर यांचा माईक बंद केला. बोरकर पत्र घेऊन सभापतीच्या आसनाकडे गेले यावेळी सभागृहातील मार्शलांनी त्यांना रोखले व सभागृहातून बाहेर काढले.

म्हादईसाठी विधानसभेत महिला आमदारांचा आवाज

म्हादईवर बोलताना ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेर्रात, पर्येच्या आमदारा दिव्या राणे आणि शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी विरोधकांनी सरकारच्या प्रयत्नांना मदत करण्याचे तसेच, म्हादईसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

चंद्रकांत शेट्ये यांनी केले मुख्यमंत्री सावंत यांचे कौतुक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना म्हादई प्रश्नाची पूर्ण जाणिव आहे. हा विषय ते व्यवस्थितपणे सोडवतील यावर आमचा विश्वास आहे. म्हादईच्या लढ्यात त्यांनी पूर्वीपासून काम केले आहे.

'म्हादई आपली अस्मिता आहे, म्हादईवर आपले अस्तित्व टिकून आहे. एवढेच नव्हे काहीजणांचे राजकारण देखील म्हादईवर टिकून आहे.' वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांचे वक्तव्य

'म्हादई'साठी सगळ्यांनी एकजूट होण्याची गरज : डॉ. विश्वजित राणे 

साखळीत झालेल्या 'म्हादई बचाव' सभेला सत्तरी, साखळीतील लोक उपस्थित नव्हते. बाहेरुन लोकांना सभेसाठी गोळा केले होते. मंत्री विश्वजीत राणे यांचा आरोप

विरोधक फक्त राजकारण करून स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात : डॉ. विश्वजित राणे 

म्हादईवरून विधानसभेमध्ये काही काळ राडा झाल्यानंतर डॉ. विश्वजीत राणे यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की गोव्याच्या राजकारणामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की विरोधक मुद्दा सोडवण्याऐवजी त्या मुद्द्याचे राजकारण करत स्वतःचा स्वार्थ साधत असतात. म्हादईसाठी आमचे सरकार सतत कार्यरत आहे. ज्या वेळेला सरकारने चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली त्यावेळेला कोणीही विरोधक बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. जर तुम्हाला खरंच नागरिकांची आणि गोव्यातील प्रश्नांची चिंता आहे तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना मदत करून हे विषय सोडवण्यासाठी हातभार लावा, असा घणाघात डॉ. विश्वजित राणे यांनी केला.

Dr. Vishwajeet Rane
Dr. Vishwajeet RaneDainik Gomantak

विधानसभेत राडा; वीरेश बोरकर 'म्हादई'वरुन आक्रमक 

मुख्यमंत्र्यांकडे बस वाढवण्याची मागणी : गुदिन्हो

दिव्या राणे यांनी नमूद केलेल्या मुद्द्यावर मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, हा प्रश्न फक्त पर्ये मतदारसंघातील नसून हा प्रश्न संपूर्ण गोव्यातील आहे. मुळातच कदंबाकडे बसेसची कमतरता आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे याची आधीच मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आता मोपा विमानतळ झाल्यामुळे कदंबाच्या काही इलेक्ट्रिक बसेस विमानतळासाठीही देण्यात आले आहेत. सरकार यावर काम करत असून आम्ही खाजगी बस कॉर्पोरेशनमध्ये आणण्याच्या विचारात आहोत.

पर्ये मतदारसंघात बस कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे हाल : डॉ. दिव्या राणे 

विधानसभेच्या दुसऱ्या सत्रामध्ये आमदार डॉ. दिव्या राणे यांनी पर्ये मतदारसंघातील समस्यांवर विधानसभेचे लक्ष केंद्रित केले. त्या म्हणाल्या की, पर्ये मतदारसंघातील विद्यार्थ्यांना कदंब बसेस कमी असल्यामुळे इतर मार्गांचा अवलंब करावा लागतो. यामुळे त्यांच्या जिवाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. मतदारसंघातील सुर्लातील मुलांना शिक्षणासाठी साखळीत यावे लागते. बस नसल्याने विद्यार्थी रस्त्यावरील कोणत्याही ट्रकमधून वाहतूक करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांना आपल्या मुलांची चिंता वाटत आहे. तर यावर वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्वरित तोडगा काढावा.

Dr. Divya Rane
Dr. Divya RaneDainik Gomantak

कला आणि संस्कृती विभागात प्रशिक्षित संगीत शिक्षकांची कमी : विजय सरदेसाई 

विजय सरदेसाई म्हणाले की, सरकारने 2019 मध्ये संगीत शिक्षक पदांसाठी मुलाखती घेतल्या होत्या. त्यामध्ये उमेदवारांच्या मार्कांमध्ये फेरबदल करण्यात आले होते. याबद्दलची संपूर्ण माहिती आणि आकडेवारी माझ्याकडे आहे. ज्यांचे मार्क जास्त होते त्यांचे मार्क कमी करण्यात आले, ज्यांचे कमी होते त्यांचे मार्क वाढवण्यात आले. असे अनेक बदल करून लोकांना पदावर घेण्यात आले. जे उमेदवार मुलाखतीमध्ये पास झाले नाहीत तेच उमेदवार उद्या संगीत शिकवायला असणार आहेत. यामध्ये खूप मोठा घोटाळा करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर देणे अपेक्षित आहे.

Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak

सरकारने शाळांमधील ग्रंथपालांच्या भविष्याचा विचार करावा : वीरेश बोरकर 

विधानसभेत आपला मुद्दाम मांडताना आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, गोव्यातील शाळांमध्ये कार्यरत असलेले ग्रंथपाल हे फक्त 14 हजार रुपयांच्या नोकरीवर काम करत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारे वाढ किंवा बढती त्यांच्या नोकरीत मिळालेली नाही. तर सरकारने त्यांचा विचार करावा अशी विनंती करतो

बायणा, बोगमाळो बीचवरील अवैध जलक्रीडा करणाऱ्यांवर कारवाई करणार : रोहन खंवटे 

आमदार कृष्णा साळकर यांनी नमूद केलेल्या अवैध जलक्रीडा मुद्द्यावर मंत्री रोहन खंवटे यांनी त्वरित कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

बायणा बीचवर अवैध जलक्रीडा : कृष्णा साळकर 

विधानसभेत वास्को आमदार कृष्णा साळकर यांनी बायणा समुद्रकिनाऱ्यावर अवैध जलक्रीडा प्रकार सुरू असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की अनेक जलक्रीडा करणारे अवैधरित्या बोटी समुद्रात घेऊन जात आहेत. यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी तर एक बोट प्रमाणापेक्षा जास्त पर्यटकांना घेऊन समुद्रात गेली आणि एक बोट तर बुडाली देखील. मला यावर सरकारला विचारायचे आहे की सरकार कोणत्या अपघाताची वाट बघत आहे का? यावर सरकारने त्वरित कारवाई करून या अवैध गोष्टी बंद कराव्यात.

Vasco MLA Daji Salkar
Vasco MLA Daji SalkarDainik Gomantak

सरदेसाई आणि रेजिनाल्ड यांच्यात काय बरं चर्चा रंगली असेल?

Goa Assembly Session Live Updates
Goa Assembly Session Live UpdatesDainik Gomantak

विजय सरदेसाईंचा सरकारवर घणाघात

गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत सरकारवर निशाणा साधत भाष्य केले. ते म्हणाले की, औद्योगिक वसाहतीतील जमीन वाटपासाठी काळ्या रंगाच्या कारमधील एक व्यक्ती लाच घेत असल्याचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगितले.

यावर आवश्यक ती कारवाई करू, असे आश्वासन उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले आहे.

Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak

विधानसभेत सत्ताधाऱ्यांचा विरोधकांवर निशाणा; गुदिन्हो-डिकोस्टा यांच्यात रंगले राजकीय वाद 

विधानसभा सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये गुदिन्हो आणि अल्टन डिकोस्टा यांच्यामध्ये राजकीय वाद रंगला. गुदिन्हो यांनी अल्टन यांना चांगलेच धारेवर धरले. यांच्या एका मुद्द्यावर भाष्य करत माविन यांनी त्यांना विचार करून आपले मत व्यक्त करायला सांगितले. ते म्हणाले, आमचे सरकार नेहमीच विरोधकांचे आणि स्थानिक आमदारांचे मत लक्षात घेत काम करत असते; त्यामुळे विरोधक म्हणून तुम्हाला जे वाटते ते मत व्यक्त करा. त्यावर आमचे सरकार विचार करून काम करेल, असा टोला यांनी लगावला.

आम्हालाही पर्रीकरांबद्दल प्रेम आहे; विरोधक यावरून विनाकारण राजकारण करत आहेत :  बाबूश मोन्सेरात

कालपासून विधानसभेत मोपा विमानतळाच्या नावावरून वाद सुरू आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की मोपाचे नाव मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ न ठेवता मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे ठेवावे. यावर बाबूश मोन्सेरात यांनी आपले मात व्यक्त केले. ते म्हणाले की, केंद्राने हे नाव पूर्ण विचार करूनच ठेवले आहे. सगळ्यांना माहिती आहे की मनोहर म्हणजे मनोहर पर्रीकरच. विरोधक असे भासवताहेत की फक्त त्यानाच पर्रीकरांबद्दल प्रेम आहे; तर असे नाही.. आम्हालाही पर्रीकरांबद्दल तितकेच प्रेम आहे. आणि सरकारचा हा निर्णय विचारपूर्वकच घेतलेला आहे.

Babush Monserrate on Mopa Airport
Babush Monserrate on Mopa AirportDainik Gomantak

अधिवेशनाचा शेवटचा दिवस; 'म्हादई' विषयावर सर्वांचे लक्ष

आज (19 जानेवारी) गोवा विधानसभा अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, आज विधानसभेत म्हादई विषयावर चर्चा होणार आहे. आजचा दिवस म्हादईसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. आज चर्चेवरुन म्हादई विषयाला वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com