Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Tarun Tejpal Surrenders in Mapusa Court: न्यायालयाने त्यांचे आत्मसमर्पण स्वीकारल्यानंतर त्यांची तात्काळ कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
Tarun Tejpal Surrenders in Mapusa Court
Tarun Tejpal CaseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: आपल्याच एका माजी सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेले ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काल सोमवारी, (ता. १४), सकाळच्या सत्रात म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले.

न्यायालयाने त्यांचे आत्मसमर्पण स्वीकारल्यानंतर त्यांची तात्काळ कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. न्यायालयात हजर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना, ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल, काळजी करण्याचे कारण नाही,’ असा दावा तेजपाल यांनी केला.

Tarun Tejpal Surrenders in Mapusa Court
Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

सुनावणीदरम्यान तेजपाल यांच्या वकिलांनी न्यायालयात एक अर्ज दाखल करत मानवी दृष्टिकोनातून त्यांना कारागृहात काही मूलभूत वस्तू वापरण्याची परवानगी देण्याची विनंती केली. यात डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे, टूथब्रश, खोबरेल तेल, चप्पल व पुस्तके यांचा समावेश होता. यावर सरकारी वकिलांनी औषधांना आक्षेप घेतला नाही, मात्र इतर गोष्टींची मुभा कारागृह नियमावलीनुसारच दिली जावी, असा युक्तिवाद केला. युक्तिवादानंतर न्यायालयाने तेजपाल यांना आवश्यक औषधे, पुस्तके घेण्यास मुभा दिली.

१० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा...

नोव्हेंबर २०१३ मध्ये घडलेल्या या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी क्राईम ब्रँचने तेजपाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर म्हापसा सत्र न्यायालयाने मे २०२१ मध्ये तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, सत्र न्यायालयाच्या या निकालाविरोधात गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने ६ ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवत तेजपाल यांना दोषी ठरवून १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.

Tarun Tejpal Surrenders in Mapusa Court
Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com