Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

African Wild Dogs 4000 km Journey Study: आफ्रिकेतील जंगलांमध्ये राहणाऱ्या रानकुत्र्यांनी वंश वाढवण्यासाठी आणि मादीचा शोध घेण्यासाठी तब्बल 4 हजार 162 किलोमीटरचा अद्भूत आणि थरारक प्रवास केल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले.
African Wild Dogs 4000 km Journey Study
Dogs Longest JourneyDainik Gomantak
Published on
Updated on

African Wild Dogs 4000 km Journey Study: आफ्रिकेतील जंगलांमध्ये राहणाऱ्या रानकुत्र्यांनी वंश वाढवण्यासाठी आणि मादीचा शोध घेण्यासाठी तब्बल 4 हजार 162 किलोमीटरचा अद्भूत आणि थरारक प्रवास केल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले. तीन भावांच्या एका टोळक्याने अवघ्या आठ महिन्यांत 4126 किलोमीटरचे अंतर पार केले असून, आफ्रिकेतील कोणत्याही सस्तन प्राण्याने पार केलेले हे आजवरचे सर्वात लांब अंतर नोंदवले गेले. ‘इकोलॉजी’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात झाम्बियातील मानवी वस्त्या, नद्या आणि डोंगरदऱ्यांमधून प्रवास करणाऱ्या रानकुत्र्यांच्या टोळ्यांचा ट्रॅकिंग डेटा सादर करण्यात आला.

संशोधनानुसार, रानकुत्रे हे नेहमी टोळीने राहतात, जिथे केवळ मुख्य नर-मादीची जोडीच प्रजननाचा अधिकार ठेवते. परिणामी, टोळीतील इतर तरुण कुत्र्यांना, विशेषतः 2 ते 3 वर्षे वयाच्या सदस्यांना नवीन साथीदार शोधण्यासाठी आणि स्वतःचे नवीन क्षेत्र प्रस्थापित करण्यासाठी टोळी सोडून भटकावे लागते. या प्रवासात वेगवेगळ्या दिशांना गेलेल्या चार टोळ्यांनी एकूण 9863 किलोमीटरचे अथांग अंतर कापले. मोंटाना स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक स्कॉट क्रील यांनी आश्चर्य व्यक्त करत सांगितले की, पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील रानकुत्र्यांची ही मोठी लोकसंख्या (Population) आजही एकमेकांशी जोडलेली असून ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.

African Wild Dogs 4000 km Journey Study
Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

मात्र, या ऐतिहासिक प्रवासासाठी प्राण्यांना अत्यंत मोठी आणि भयानक किंमत मोजावी लागत आहे. 'EWD-1355' नावाच्या एका मादी रानकुत्र्याने झाम्बिया ते मोझांबिक असा 2300 किलोमीटरचा खडतर प्रवास केला होता, परंतु जून 2022 मध्ये एका जाळ्यात अडकून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. झाम्बियन कार्निव्होर प्रोग्रामने जीपीएस कॉलरचा वापर करुन या प्राण्यांचा माग काढला.

African Wild Dogs 4000 km Journey Study
Donald Trump Coin Controversy: अमेरिकेच्या चलनावर 'डोनाल्ड ट्रम्प'! 1 डॉलरच्या नव्या नाण्यावरुन गदारोळ; काय सांगतो अमेरिकन कायदा?

रानकुत्र्यांच्या या टोळ्या मोठ्या नद्या, महामार्ग, ग्रेट रिफ्ट व्हॅलीचे खडे डोंगर आणि मानवी शहरे पार करत सातत्याने पुढे जात आहेत. प्राण्यांमधील हा नैसर्गिक संपर्क आणि मार्ग अजूनही जिवंत आहेत हे या संशोधनातून सिद्ध झाले असून, आता हे नैसर्गिक कॉरिडोर सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com