RGP Congress Alliance Dainik Gomantak
गोवा

RGP Congress Alliance: ''12 जागा द्या, नाहीतर स्वतंत्र लढा", आरजीचा काँग्रेसला अल्टीमेटम; आघाडीचा तिढा कायम

Goa Assembly Elections 2027 seat sharing: आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने किमान १२ जागा न दिल्यास स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजी) रविवारी पर्वरी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने किमान १२ जागा न दिल्यास स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजी) रविवारी पर्वरी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आरजी या दोन पक्षांतील आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असले, तरी आरजीने काँग्रेसकडे महिनाभरापूर्वी १६ जागांची मागणी केली होती. मात्र, निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आलेली असतानाही काँग्रेसकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर आणि प्रदेशाध्यक्ष शविना शिरोडकर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची पर्वरी येथे बैठक घेतली.

काँग्रेससमोर सादर करण्यात आलेला प्रस्ताव तसेच पुढील रणनीतीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावेळी आरजीच्या पदाधिकाऱ्यांनी १२ जागांवर ठाम राहण्याचा सल्ला बोरकर यांना दिला. निवडणुकीत मागणी केलेल्या बाराही मतदारसंघांत आरजी मजबूत असल्याने आघाडीतील प्रमुख घटक म्हणून काँग्रेसने हे मतदारसंघ आरजीला सोडणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत विचार करावा, असेही पदाधिकाऱ्यांनी बोरकर यांना सांगितले. त्यानुसार, काँग्रेससोबत पुढील चर्चा करण्यासाठी निवडणूक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर पुढील निर्णय घेणार : वीरेश बोरकर

बैठकीत जागावाटप आणि निवडणुकीच्या तयारीबाबत पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेससोबत (Congress) जागावाटपाची अंतिम चर्चा करण्यासाठी लवकरच निवडणूक समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती पक्ष बळकट असलेल्या मतदारसंघांचे दौरे करून दिवाळीनंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करेल, असे आरजीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी मोठा धक्का! 2 स्टार खेळाडू अचानक बाहेर, आता संघासमोर नवं आव्हान

खरी कुजबुज: अन् सुतासारखे झाले सरळ

Rahul Gandhi Speech: 'ज्ञानेशकुमारांचा तुरुंगवास अटळ'! राहुल गांधींचा हल्लाबोल, मतांच्या चोरीविरोधात काँग्रेस आक्रमक

Old Goa Crime: खाकीला कलंक! जुने गोवे लैंगिक शोषण प्रकरणी बाल हक्क आयोगाची गंभीर दखल, 3 दिवसांत मागितला अहवाल

Marriage Certificate: गोव्यात 'डेस्टिनेशन वेडिंग' करणाऱ्यांसाठी मोठी खूषखबर; आता राज्यातच मिळणार मॅरेज सर्टिफिकेट! CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT