Old Goa Crime: खाकीला कलंक! जुने गोवे लैंगिक शोषण प्रकरणी बाल हक्क आयोगाची गंभीर दखल, 3 दिवसांत मागितला अहवाल

Old Goa Crime Branch Minor Abuse: जुने गोवे येथील गुन्हे शाखा कार्यालयात पोलिस निरीक्षकाने केलेल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
Old Goa Crime
Old Goa CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: जुने गोवे येथील गुन्हे शाखा कार्यालयात पोलिस निरीक्षकाने केलेल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने प्रसारमाध्यमांतील वृत्तांच्या आधारे याप्रकरणी स्वेच्छा दखल घेत पोलिस महानिरीक्षकांना चौकशीचा सविस्तर अहवाल येत्या तीन दिवसांत सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

अल्पवयीन मुलीच्या (Girl) कथित लैंगिक शोषणाचे वृत्त ३० ऑक्टोबर रोजी विविध वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर आले होते. यामध्ये जुने गोवे येथील गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास देयकर याने मुलीवर अत्याचार केल्याचा ठपका ठेवला होता. बाल हक्क आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या आपल्या अधिकृत जबाबदारीनुसार, हा ईमेल मिळाल्यापासून ३ दिवसांच्या आत तक्रारीची प्रत, ‘एफआयआर''ची प्रत आणि तपास अहवाल आयोगाकडे सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

Old Goa Crime
Goa Water Old Pipeline: 'जीर्ण पाईपलाईन बदलल्या जाणार'! मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती; पाणीचोरी, गळती रोखण्‍यासाठी ‘फ्‍लो मीटर्स’

गोपनीयता राखण्याचे निर्देश

या प्रकरणामध्ये एक अल्पवयीन मुलगी पीडित असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका अधिकाऱ्याचा समावेश असल्यामुळे आयोगाला त्वरित पाऊल उचलावे लागले. आयोगाने पीडित मुलीची ओळख आणि तिची गोपनीयता राखणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.