TCP Department Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: टीसीपी मंत्र्यांच्या अधिकारांवर निर्बंध

सरकारचा निर्णय: शिफारस प्रस्ताव समिती बरखास्त

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याच्या प्रादेशिक आराखडा 2021 नुसार इमारत व भूविकास प्रकल्पांच्या प्रस्तावाची शिफारस करणारी नगर व शहर नियोजन खात्याने नेमलेली समिती सरकारने बरखास्त केली आहे. त्याऐवजी तालुका व जिल्हा तसेच मुख्य नगर नियोजकांना बांधकाम प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळी नगर व शहर नियोजन मंत्र्यांच्या अधिकारांना कात्री लावण्यात आली आहे.

मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी काढलेल्या आदेशानुसार इमारत व भूविकास प्रकल्पांच्या प्रस्तावांना तांत्रिक परवाना देण्यासाठी तालुका स्तरावर 1 हजार चौ.मी. बांधकाम क्षेत्राला व 10 हजार चौ.मी. क्षेत्राला अधिकार दिला आहे तर जिल्हा स्तरावर 2 हजार चौ. मी. पर्यंत तांत्रिक परवाना देण्याचा अधिकार तर भूविकास प्रस्तावासाठी 20 हजार चौ.मी. पर्यंत अधिकार दिला आहे. 2 हजार चौ. मी. वरील इमारत प्रकल्पासाठी तांत्रिक परवाना तर भूविकास प्रस्तावासाठी 20 हजार चौ. मी. वरील प्रकल्पांसाठी अधिकार मुख्य नगर नियोजकांना देण्यात आला आहे.

नगर नियोजन खात्याकडे आलेले अर्ज मुख्य नियोजकांकडून ते सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणे सक्तीचे करण्यात आले आहे. यापूर्वी या खात्याच्या मंत्र्यांना ते अधिकार होते. त्यामुळे मंत्र्यांच्या खातेवाटपापूर्वीच सरकारने या खात्याचे काही अधिकार काढून घेतले असून समिती बरखास्त केली आहे. परवान्याचे नूतनीकरण, नगर व शहर नियोजन कायद्यांतर्गत ना हरकत दाखला, क्षेत्रीय

प्रमाणपत्र व काम पूर्ण झाल्याचा दाखला यासंदर्भातची प्रक्रिया व आदेश देण्याचा अधिकार सदस्य सचिवांना बहाल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT