'गोव्यातही कोविड नियम हटवण्याची आवश्‍यकता'

तज्ज्ञांचे मत: आज सरकार आदेश जारी करण्याची शक्यता
Covid need to be removed in Goa too
Covid need to be removed in Goa tooDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोविडची लाट ओसरल्याने महाराष्ट्र सरकारने राज्यातील निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. मास्क सक्तीही उठवण्यात आली आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही कोविडबाधितांची संख्या खूपच अत्यल्प बनल्यामुळे तसेच नवीन लाट येण्याची शक्यता नसल्यामुळे राज्यातही कोविड निर्बंध संपूर्णत: हटवण्याबाबत तज्ज्ञांचे एकमत आहे. राज्य सरकार आता कधी तज्ज्ञ समितीची बैठक बोलावते, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांच्या मते, शुक्रवारी, ता.1 एप्रिलपासून राज्य सरकार एका आदेशान्वये सर्वपान निर्देश मागे घेण्याची शक्यता आहे.

Covid need to be removed in Goa too
शेततळीत बुडून दोन मुलांचा अंत; करमळी-केरी येथील हृदयद्रावक दुर्घटना

‘गोव्यात तातडीने कोविडचे सर्व निर्बंध हटवण्याची वेळ आली आहे. कोविडचा संसर्ग कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाही; कारण नवीन व्हेरियंट खूपच सौम्य आहे,’ असे मत माजी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज 'गोमन्तक'शी बोलताना व्यक्त केले. राणे यांनी आरोग्य खाते यशस्वीरीत्या हाताळल्यामुळे हे खाते त्यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. मला या खात्याविषयी आस्था आहे, शिवाय बरीच कामेही पूर्ण करायची आहेत, असे ते म्हणाले.

राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. धनेश वळवईकर म्हणाले, सध्या मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व सेनिटेशन हे उपाय सोडले तर कोविडचा अन्य कोणताही निर्बंध राज्यात लागू नाही. चाचण्याही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोविडचे कडक निर्बंध चालू ठेवण्याची कोणतीही आवश्‍यकता नाही. मी मागच्या बैठकीतही निर्बंध काढून टाकण्याची विनंती केली होती. आता लवकरच बैठक बोलावून निर्बंध मागे घेणे शक्य आहे,’ असे वळवईकर म्हणाले.

तज्ज्ञ समितीच्या बैठकीकडे लक्ष

कोविड महामारी कायदा आज मध्यरात्री संपुष्टात येत असून केंद्र सरकारने तो वाढवण्याची कोणतीही तरतूद सुरू केलेली नाही. तरीही राज्य सरकारला परिस्थितीचा आढावा घेऊन काही निर्बंध लागू ठेवता येतात. राज्यात गेले काही दिवस नवीन रुग्णांची संख्या पाचपेक्षा कमी होती, ती आज एकदम बारा बनली असली तरी चिंतेचे कारण नाही. तरी नवीन कोविड रुग्णांसाठी काही निर्बंध चालू ठेवणे शक्य आहे,’ असे मत तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केले

Covid need to be removed in Goa too
निवडणुकीनंतर गोवा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल; अमित पाटकर गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

रुग्णसंख्येत घट

निर्बंध हटवण्यासाठी केंद्राचे निर्देश आलेच आहेत; परंतु राज्य सरकारने आतल्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच पावले उचलायची आहेत. त्यानुसार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीची बैठक बोलावूनच निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. - विश्‍वजित राणे, मंत्री

सध्या कोविडची स्थिती अत्यंत आटोक्यात आहे. कोणताही धोका नाही. नवीन लाट येण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे निर्बंध हटवणे योग्य ठरेल. आयपीएल फुटबॉल सामने, शपथविधी सोहळा व शिमगोत्सवासाठी यापूर्वीच निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे आता लोकांच्या जमावावर निर्बंध लागू करणे किंवा परवानगीची अट लादणे आवश्‍यक नाही. - डॉ.धनेश वळवईकर, तज्ज्ञ समितीचे सदस्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com