Protest Against Bhoma Highway: Dainik Gomantak
गोवा

Bhoma Highway Protest: बायपास आमका जाय..! महामार्ग रूंदीकरणाविरोधात एकवटले भोमावासीय

स्थानिकांच्या रॅलीला मंत्री गोविंद गावडेंनीही दिला पाठिंबा

Akshay Nirmale

Protest Against Bhoma Highway: पणजी-बेळगाव महामार्गावर भोमा येथे होत असलेल्या रूंदीकरणाविरोधात आज, रविवारी भोमावासीय एकवटले. स्थानिकांनी या महामार्गाच्या रूंदीकरणाला विरोध करत त्यापेक्षा बायपास करा, अशी मागणी करत रॅली काढली. यावेळी क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडेंनी देखील या रॅलीला पाठिंबा दर्शवला.

पणजी आणि बेळगाव या दोन शहरांना जोडणाऱ्या महामार्गाचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. तथापि, या रूंदीकरणात भोमा येथील काही घरे उद्धवस्त होऊ शकतात. त्यांना भरपाई देण्याची तयारी असली तरी संबंधित घरमालकांसह स्थानिक गावकऱ्यांचा याला विरोध आहे. त्यामुळेच त्याविरोधात आज, रविवारी याविरोधात रॅली काढण्यात आली.

'आमका जाय, आमका जाय, बायपास आमका जाय,' अशा घोषणा देत मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले. यावेळी क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी देखील या रॅलीला पाठिंबा दिला. स्थानिकांच्या बाजूने राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, या राष्ट्रीय महामार्गाबाबत मी २०१२ पासूनच सक्रीय आहे. तुमचा प्रश्न चर्चेतून सोडवला जाईल. राष्ट्रीय महामार्गाची काही व्यवहार्यता, तांत्रिकता, काही एक प्रक्रिया असते. मला यात राजकारण येऊ नये असे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hospital Infrastructure: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून 'आप' आक्रमक; आरोग्य सुविधा सुधारण्याची मागणी

Government Schemes: 'सरकार तुमच्या दारी'ला गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच दिवशी 5,960 नागरिकांचा सहभाग

Crime News: लग्नाचे प्रलोभन दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप; पॉक्सो न्यायालयाकडून आरोपीवर आरोप निश्चित

CCP Election Case: सीसीपी निवडणूक वादात अधिकारक्षेत्राचा मुद्दा; जिल्हा न्यायालयाला नियम रद्द करता येत नसल्याचा दावा

Fake Voters Allegations: फातोर्ड्यात 50 हून अधिक बोगस मतदार? सरदेसाईंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT