Bhausaheb Bandodkar Dainik Gomantak
गोवा

Bhausaheb Bandodkar बांदोडकर समाधीस्थळ नूतनीकरणाला अखेर मुहूर्त!

या कामाची सुरवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Bhausaheb Bandodkar: राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण करण्यास अखेर सरकारला मुहूर्त सापडला आहे. आज सकाळी 9 वाजता या कामाची सुरवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

मिरामार येथे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्मृतीस्थळ भव्य स्वरूपात आकाराला आणले जात आहे. त्याशेजारीच असलेल्या बांदोडकर यांच्या समाधीस्थळाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत होते.

समाज माध्यमावर त्यामुळे सरकारला टीकेचा सामना करावा लागत होता. हे समाधीस्थळ कुलूपबंद ठेवू नये, असे मतही व्यक्त केले जात होते.

अखेर सरकारने भाऊसाहेबांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीचे निमित्त साधून गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाधीस्थळाचे नूतनीकरण करण्याचे ठरवले आहे.

मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांसह पुण्यतिथीनिमित्त या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहणार आहेत. त्यानंतर दुरुस्तीच्या कामाची सुरवात केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT