HIGH COURT OF BOMBAY AT GOA Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील रस्त्यावरील जाहिरातींचे फलक आणि डिजिटल स्क्रीन असलेली वाहने हटवा; HC

High Court of Bombay At Goa: 10 मे पर्यंत अशा वाहनांना हटवण्याबाबत अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश.

Pramod Yadav

High Court of Bombay At Goa

रस्त्यावरील जाहिरातींचे फलक आणि डिजिटल स्क्रीन असलेली वाहने हटवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी वाहतूक प्राधिकरण आणि पोलीस विभागाला दिले आहेत.

फिरती जाहिरात वाहने मोकळी जागा, फूटपाथ, रस्त्याच्या कडेला, जंक्शन आणि चौकाचौकांतून तत्काळ हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत.

वाहतूक प्राधिकरण आणि पोलिस विभागाला 10 मे पर्यंत अशा वाहनांना हटवण्याबाबत अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

भविष्यात फूटपाथ किंवा चौकात अशी डिजिटल स्क्रीन व जाहिराती असलेली मोबाईल वाहने उभी करता येतील का? हे तपासण्याचे देखील निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत.

जाहिरातींसाठी डिजिटल स्क्रीन असलेली ही वाहने शहराच्या आसपास रस्त्यांवर किंवा पार्किंगच्या ठिकाणी पार्क केली जातात यामुळे अडथळा निर्माण होतो, असे ज्येष्ठ वकील आणि ॲमिकस क्युरी एस डी लोटलीकर यांनी न्यायालयास सांगितले.

वाहतूक विभाग फूटपाथ आणि चौकाचौकात या वाहनांच्या कायमस्वरूपी पार्किंगच्या प्रश्नाकडे लक्ष देईल आणि सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करेल, असे अतिरिक्त सरकारी वकील दीप शिरोडकर यांनी न्यायालयास सांगितले.

दरम्यान, अशा वाहनांच्या नोंदणीसंबधित विशेष शुल्क किंवा कर आकारण्यासाठी मोटार वाहन कायदा आणि नियम तसेच गोवा सरकारच्या परिपत्रकांखालील तरतुदींचे उच्च न्यायालय परीक्षण करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT