Cape News : केप्यात मोठ्या आघाडीची अपेक्षा : मुख्यमंत्री

Cape News : भाजपच्या उमेदवार पल्लवी श्रनिवास धेंपे यांच्या प्रचारासाठी केपे मतदारसंघातील तळेवाडा - शिरवई, बार्से व खोला येथे कोपरा बैठका घेण्यात आल्या. या कोपरा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
Cape
CapeDainik Gomantak
Published on
Updated on

Cape News :

मडगाव, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली केपे मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते नेटाने प्रचार कार्य करत असून मतदारांकडून भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

भाजपच्या उमेदवार पल्लवी श्रनिवास धेंपे यांच्या प्रचारासाठी केपे मतदारसंघातील तळेवाडा - शिरवई, बार्से व खोला येथे कोपरा बैठका घेण्यात आल्या. या कोपरा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी पल्लवी धेंपे, बाबू कवळेकर, सावित्री कवळेकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष खुशाली जोरगो वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, संजना वेळीप, केप्याच्या नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, नगरसेवक दयेश नाईक, अमोल काणेकर, चेतन हळदणकर, प्रसाद फळदेसाई, गणपत मोडक, दीपाली नाईक, सरपंच शीतल नाईक, देविदास वेळीप, कृष्णा वेळीप, देविदास गावकर, भूपेंद्र गावस देसाई, उपसरपंच पंढरी प्रभुदेसाई, बाबू प्रभुदेसाई, मेदिनी नाईक, आलुलियो आफोन्सो, फ्रॅंकी गोन्साल्वीस, भाजपच्या एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, केपे मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, दक्षिण गोवा खजिनदार राजीव सुखटणकर उपस्थित होते.

कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली केपे मतदारसंघातील कार्यकर्ते एकजुटीने भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांचा प्रचार करत असून मतदारांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपचाच प्रभाव दिसत असून भाजप ६० हजार मतांच्या आघाडीने विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळेच देशाचा चौफेर विकास घडला असून भाजप सरकारमुळे गोव्याने भरारी घेतली आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी निवडून द्या, असे पल्लवी धेंपो यांनी सांगितले.

Cape
Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

डबल इंजिन सरकारमुळे सर्वत्र प्रगतीच

देशाचा सर्वांगीण विकास साधण्याबरोबच जगात भारताचा सन्मान वाढविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात सरकार आणण्यासाठी भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन बाबू कवळेकर यांनी केले.

भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे सर्वत्र प्रगतीच घडत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून राज्याचा सर्वांगीण विकास घडत आहे. केपे मतदारसंघातील विकासकामे त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Politics
Ryan Mendes rape allegations
Vozinha Goalkeeper Cape Verde vs Spain
home minister amit shah reviews goa st reservation file
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com