Risky Hoardings In Margao Dainik Gomantak
गोवा

Risky Hoardings In Margao: धोकादायक जाहिरात फलक हटवा; मडगाववासीयांची नगरपालिकेकडे मागणी

Risky Hoardings In Margao: या संदर्भात बोलताना नितीन नाईक याने सांगितले की या चौकटीतील पत्रे काढल्याने ती अजून शाबूत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Risky Hoardings In Margao

मडगाव मध्य भागातील जुन्या बस स्टॅण्ड वर बाजूला जुन्या जाहिरात फलकाची लोखंडी चौकट खाली पडण्याच्या स्थितीत आहे. या चौकटीखाली खासगी वाहने ठेवली जातात. शिवाय तिथे लोकांची वर्दळही असते.

पावसाळ्यात मोठा वारा आला तर ही लोखंडी चौकट खाली पडण्याची भीती तेथील लोकांनी व्यक्त केली आहे व ही चौकट दोन दिवसांच्या आत हटवावी, अशी मागणी मडगाव नगरपालिकेकडे केली आहे.

या संदर्भात बोलताना नितीन नाईक याने सांगितले की या चौकटीतील पत्रे काढल्याने ती अजून शाबूत आहे. अधिकारी येतात बघतात व जातात पण त्यातुन काहीच निष्पन्न होत नाही. जर पावसाळ्यात ही लोखंडी चौकट पडली तर आमच्यावरच पडेल ,अशी भीती नाईक यानी व्यक्त केली.

व्यवसायिक फॅब्रिकेटर दिनेश काकोडकर यांनी सांगितले की, ही लोखंडी चौकट एरव्ही चार खांबावर बसवली होती. मात्र, ही लोखंडी चौकट गंजलेली असल्याने तिचे तीन खांब सुटलेले आहेत व ती एका खांबावर सध्या असून पडण्याची शक्यता आहे. सरकारने, पालिकेने त्वरित ती हटवावी, अशी आपली मागणी असल्याचे काकोडकर याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीची तारीख अखेर जाहीर! प्रचाराची रणधुमाळी वाढण्याची चिन्हे; 4 मे रोजी होणार मतमोजणी

Horoscope: 'या' राशींना होणार धनप्राप्ती! ग्रह देताहेत शुभसंकेत; कुणाला होणार फायदा? वाचा राशिभविष्य

LPG Gas Cylnder: गोव्यात भीतीमुळे गॅसचे झपाट्याने 'बुकिंग'! एका दिवसात तब्बल 'इतक्या' सिलिंडरचे वितरण; किती साठा आहे शिल्लक? वाचा..

Dhurandhar 2: "यासाठी धुरंधरमधला रोल सोडला"! प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा; बॉलिवूडमध्ये रंगली जोरदार चर्चा

Kanagi: ‘गोंयकार’ गृहिणी तव्यावर लोणी सोडून मग डोळे बंद करून भाजीच्या टोपलीत हात घालतात; 'कणगी'महात्म्य

SCROLL FOR NEXT