Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Mapusa Coconut Sale Two Rupee: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी म्हापशात स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
Mapusa Coconut Sale Two Rupee
Mapusa Coconut PriceDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी म्हापशात स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते योगेश केळकर यांनी लोहिया गार्डनजवळील आपल्या दुकानात अवघ्या दोन रुपयांत नारळ उपलब्ध करून दिले.

गोमंतकीय नागरिकांना आधारकार्ड दाखवून प्रतिव्यक्ती पाच नारळ केवळ १० रुपयांत देण्यात आले. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत सायंकाळी तीन तास हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने दुकानाबाहेर नारळ घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नऊ ते दहा हजार नारळांची व्यवस्था करण्यात आली होती.

Mapusa Coconut Sale Two Rupee
Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

आठ वर्षांपासून उपक्रम

याबाबत योगेश केळकर म्हणाले की, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळावा आणि प्रत्येकाचा गणेशोत्सव आनंदात साजरा व्हावा, या हेतूने गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. यामागे कोणताही राजकीय हेतू नसून, लोकसेवा करणे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हेच उद्दिष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com