Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

Goa Fodder Production Plan: राज्यातील चारा टंचाईवर मात करून हिरवा व वाळलेला चारा उत्पादनात स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी सरकारने ‘गोवा चारा संसाधन विकास आराखडा’ मंजूर केला आहे.
Goa Fodder Production Plan
Goa AgricultureDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यातील चारा टंचाईवर मात करून हिरवा व वाळलेला चारा उत्पादनात स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी सरकारने ‘गोवा चारा संसाधन विकास आराखडा’ मंजूर केला आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून, गोवा चारा कृती दलाच्या देखरेखीखाली आराखड्याचे परीक्षण व आवश्यकतेनुसार सुधारणा केली जाणार आहे.

राज्यात सध्या हिरव्या चाऱ्याची मोठी कमतरता आहे. उपलब्ध कृषी संसाधनांतून दुग्ध व्यवसायाची हिरवा व वाळलेला चारा गरज सुमारे ४० टक्केच भागते. चाऱ्याच्या उत्पादनासाठी जमीन, पाणी, मजूर, दर्जेदार बियाणे व लागवड साहित्याची कमतरता ही प्रमुख अडचण असल्याचे आराखड्यात नमूद आहे. २०१९च्या पशुगणनेनुसार राज्यात सुमारे १.३२ लाख पशुधन असून, वाढलेल्या संकरित पशुधनामुळे चाऱ्याची गरजही वाढली आहे.

Goa Fodder Production Plan
Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

आराखड्यानुसार राज्याला वर्षाला सुमारे ३.९९ ते ४.४८ लाख टन हिरवा चारा, १.६० ते १.८० लाख टन वाळलेला चारा आणि ०.५४ ते ०.६१ लाख टन पशुखाद्याची गरज भासते. सध्या चारा पिकांखालील क्षेत्र एक हजार हेक्टरपेक्षाही कमी असून, लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या पाच टक्के म्हणजे सुमारे ७,९०० हेक्टर क्षेत्र चारा पिकांसाठी आणण्याचे उद्दिष्ट आहे.

पीक फेरपालट लक्षात घेता हे क्षेत्र सुमारे दहा हजार हेक्टरपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. यापैकी सुमारे पाच हजार हेक्टरवर बहुवर्षायू चारा पिके, तर पाच हजार हेक्टरवर वार्षिक चारा पिके घेण्याचे प्रस्तावित आहे. बाजरी-नेपियर संकरित, गिनी गवत, बहुवर्षायू ज्वारी, मका, ज्वारी, चवळी आदी पिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. फळबागांमधील मोकळ्या जागेतही चारा पिकांची लागवड करण्याचा प्रस्ताव आहे.

Goa Fodder Production Plan
Goa Cultural: गोव्यातील गणपतीची अनोखी काष्ठशिल्प परंपरा! च्यारी-चितारी समाजाच्या हातातून साकारलेले लाकडी गणेशरूप, शेकडो वर्षांचा समृद्ध वारसा

दहा गावांमध्ये राबवणार योजना

प्रायोगिक टप्प्यात उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येकी दोन समूह निवडून एकूण दहा गावांमध्ये योजना राबविली जाणार आहे. पहिल्या वर्षी २०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन असून, प्रायोगिक कार्यक्रमासाठी पाच वर्षांत सुमारे १.३८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com