Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

Galjibaga Beach Erosion Goa: गालजीबाग किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात धूप व झीज होत असून, त्याकडे वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी केला आहे.
Galjibaga Beach Erosion Goa
Galgibaga Beach affected by coastal erosion in South GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण: गालजीबाग किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात धूप व झीज होत असून, त्याकडे वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी केला आहे.

ही धूप अशीच सुरू राहिल्यास भविष्यात गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता असून, त्याचा गंभीर परिणाम स्थानिक रहिवाशांना भोगावा लागू शकतो. त्यामुळे सरकारने तातडीने किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कोमरपंत यांनी गालजीबाग किनाऱ्याची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केली.

Galjibaga Beach Erosion Goa
Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गालजीबागचा संपूर्ण किनारा वनखात्याच्या सागरी विभागाकडे कासव संवर्धनासाठी आरक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप सुरू असून, त्यावर प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे कोमरपंत यांनी निदर्शनास आणून दिले.

उन्‍मळून पडलेल्‍या झाडांचे बुंधे ‘जैसे थे’

सुमारे चार वर्षांपूर्वी किनाऱ्यावरील पन्नासहून अधिक सुरूची झाडे उन्मळून पडली होती. या झाडांचे बुंधे आजही किनाऱ्यावर तसेच पडून आहेत. धूप वाढत असताना किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

Galjibaga Beach Erosion Goa
Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com