Goa Rainfall  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: पणजीत या हंगामातील विक्रमी पाऊस; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

घरे, दुकानांमध्ये शिरले पाणी : अनेक ठिकाणी पूरस्थिती; जनजीवन विस्कळीत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rain Update हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत या हंगामातील सर्वाधिक 146 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पणजी शहरात तर 202.9 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला.

गेल्या काही महिन्यांपासून पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरू होती. या बांधकामांमुळे शहरातील गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि बांधकाम साहित्य गेल्याने ती बुजली होती.

अशा स्थितीत विक्रमी पाऊस पडल्याने गटारे तुडुंब भरून वाहू लागली. परिणामी गटारांतील पाणी रस्त्यांवर आले आणि त्याची दुर्गंधीही पसरली. सर्वत्र पूरसदृश स्थिती निर्माण झाली.

मुख्य शहरासह करंजाळे, मिरामार, सांतिनेज, भाटले, मळा, कदंब बस स्टॅण्ड परिसरातील स्थितीही भयावहच होती. यामुळे त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला.

स्मार्ट सिटीची कामे योग्य रीतीने झालेली नाहीत, याबाबत नागरिकांनी यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या. पाणी दुकाने, घरांमध्ये शिरल्याने स्थानिक लोकांचे मोठे नुकसान झाले.       

वाहतूक ठप्प

राज्यभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले असून अटल सेतू जवळ मिरशीकडील भागात पाणी साठल्याने इथली वाहतूक विस्कळीत झाली.

याशिवाय मळ्यातील रस्त्यावर पाणी आल्याने वाहन चालकांना या पाण्यातून रस्ता काढावा लागला, तर राजधानी पणजीतही अनेक ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक थंडावली आहे.

विक्रमी पाऊस

राजधानी पणजीत गेल्या 24 वर्षांतील विक्रमी 202.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याचा फटका इथल्या जनजीवनालाही बसला. अनेक दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांबरोबर नागरिकांनाही याचा त्रास झाला. नुकसानीची निश्चित आकडेवारी हाती आली नसली तरी लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

40 लाख पाण्यात:-

सांत आंद्रे मतदारसंघातील सांतान चर्च येथील उतरणीवरील संरक्षक भिंत बुधवारी पहाटे कोसळली. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. सुदैवाने, या घटनेत जीवितहानी झाली नाही.

गेल्या वर्षीच या रस्त्याची दुरुस्ती तसेच डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. यासाठी सरकारने जवळपास 40 लाखांचा खर्च केला आहे. एकाच पावसात 40 लाख रुपये पाण्यात गेल्याची टीका स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT