Rain In Goa Dainik Gomantak
गोवा

Pre Monsoon Rain: रेकॉर्डब्रेक 'मान्सूनपूर्व'! 983 टक्क्यांहून अधिक पाऊस बरसला; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

Goa Rain: डॉ. रमेशकुमार म्हणाले, हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचे मुख्य कारण अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा होय.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात मागील चार दिवसांपासून जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे. मागील दहा-पंधरा वर्षांत सरासरी मान्सूनपूर्व पावसाच्या तुलनेत तब्बल ९८३ टक्क्यांहून अधिक पाऊस पडल्याचे एनआयओचे शास्त्रज्ञ (निवृत्त) एम.आर. रमेशकुमार यांनी सांगितले.

डॉ. रमेशकुमार म्हणाले, हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचे मुख्य कारण अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा होय. त्याच्या प्रभावामुळे राज्यातील सर्व केंद्रांवर २५५ मिमी म्हणजेच १० इंचाहून अधिक पाऊस आत्तापर्यंत पडला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत सर्वाधिक मान्सूनपूर्व पाऊस हा धारबांदोड्यात बरसला आहे. धारबांदोड्यात तब्बल २१.२२ इंच, त्या खालोखाल मडगाव २१.१७ इंच, दाबोळी २०.३१ इंच, मुरगाव १९.३३ इंच, केपे १८.६१ इंच, म्हापसा १८.३३ इंच, पेडणे १६.५५ इंच, फोंडा १६.५४ इंच, साखळी - १५.६२ इंच, जुने गोवे १५.०६ इंच, पणजी १४.७० इंच, काणकोण १२.४४ इंच, तर वाळपई येथे १०.४ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

‘मान्सूनपूर्व’चा लेखाजोखा

मान्सूनपूर्व सर्वात कमी पाऊस

२५५.१ मिमी. (१०.०४ इंच)

आतापर्यंत राज्यात बरसलेला मान्सूनपूर्व पाऊस

४३६.१ मिमी. (१७.१६ इंच)

सरासरी पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस

९८३.४ टक्के

मान्सूनपूर्व सर्वाधिक पाऊस-धारबांदोडा

५३९ मिमी. (२१.२२ इंच)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT