Goa Rain: ‘अवकाळी’चा धुमाकूळ! पावसाळापूर्व कामे खोळंबली; 'शाकारणी'साठी भाव वाढला

Pre Monsoon Rain Goa: गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ आणि त्यातच मोसमी पाऊस जवळ आल्याने पावसाळापूर्व कामे उरकून घ्यायचे आव्हान जनतेसमोर आहे.
Goa Rain News
Pre Monsoon Rain GoaDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: मॉन्सूनपूर्व कामांची लगबग सुरू झाली असतानाच, ‘अवकाळी’ पावसाने धुमाकूळ घातल्याने सध्या डिचोलीत घरे शाकारणी आदी कामे अडून पडली आहेत. जोरदार पावसामुळे ही कामे करायला अडचण निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक चिंतेत असल्याचे आढळून येत आहे.

गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ आणि त्यातच मोसमी पाऊस जवळ आल्याने पावसाळापूर्व कामे उरकून घ्यायचे आव्हान जनतेसमोर आहे. तर दुसऱ्याबाजूने मजुरांचा भाव वाढण्याची शक्यता आहे.

सध्याच्या संधीचा मजूर फायदा घेण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाची चाहूल लागली, की ग्रामीण भागात गोठे, कौलारू घरांची शाकारणीच्या कामांना हात घालण्यात येतो. नुकतेच कोठेतरी या कामांची लगबग सुरू झाली होती. मात्र अचानक अवकाळी पावसाने कहर केल्याने बहुतेक भागात ही कामे खोळंबून पडली आहेत.

Goa Rain News
Goa Rain: कुठे दरड कोसळली, कुठे झाड पडले तर काही ठिकाणी घरात शिरले पाणी; गोव्यात दुसऱ्या दिवशीही धुँवाधार पाऊस

दुसऱ्या बाजूने अजूनही बाजारात प्लास्टिक, पत्रे आदी साहित्याला मागणी असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पावसाळ्याची चाहूल लागली, की बहूतेकजण घरे शाकारणी, प्लास्टिकची आच्छादने टाकणे आदी पावसाळापूर्व कामांना हात घालतात. काहीजण मोसमी पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे आटोपूनही घेतात.

Goa Rain News
Goa Rain: गोवा, कोकणपट्टा ‘अलर्ट मोड’वर! 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार; पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी

मजुरीत वाढ!

घरे शाकारणी करण्यात सध्या मजूर हजार ते दीड हजार रुपये मजुरी आकारतात. तर मजुरांचा गट ठराविक रक्कम ठरवून ही कामे करीत आहेत. मजूर कमी असल्याने मजुरीतही वाढ झाली आहे. अन्य पर्याय नसल्याने पावसाळापूर्व कामे कामे आटोपून घेणे आवश्यक असल्याने अनेकजण मजूर सांगतात, ती रक्कम मोजायला अनेकजण तयार असतात. लोकांची गरज ओळखून हे मजूर अडवणूक करतात, असे लाडफे येथील बाबू चननकर आदी काहीजणांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com