Bicholim Gimone Pilgao Ram Mandir Dainik Gomantak
गोवा

Ancient Ram Mandir: छत्रपती संभाजीराजांच्या शोधात आला मुघल सम्राट, उद्ध्वस्त केले गोव्यातील राम मंदिर, 1985 साली सापडले अवशेष

Gimone Pilgao Ram Mandir: डिचोली तालुक्यातील गिमोणे - पिळगाव येथील नवीन मंदिराशेजारी असलेल्या भगवान श्रीरामांचे प्राचीन मंदिराचे पुनःनिर्माण करण्याची मागणी रामभक्तांनी केली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोली तालुक्यातील गिमोणे - पिळगाव येथील नवीन मंदिराशेजारी असलेल्या भगवान श्रीरामांचे प्राचीन मंदिराचे पुनःनिर्माण करण्याची मागणी रामभक्तांनी केली आहे. स्थानिक नागरिक हे मंदिर राज्यातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असल्याचे मानतात.

या मंदिराच्या स्थापनेची तारीख माहीत नसली, तरी या मंदिराच्या विद्ध्वंसाचे वर्ष १६८४ आहे, म्हणजेच हे गोव्यातील सर्वात प्राचीन राम मंदिर आहे, असे गिमोणे - पिळगाव येथील रामचंद्र ऊर्फ ​​रघुनाथ संस्थानचे मुखत्यार मश्चिंद्र च्यारी म्हणाले. त्यांनी सांगितले की, पी. एस. पिसुर्लेकर यांनी लिहिलेल्या ‘संभाजी’ या पुस्तकानुसार, एक मुघल सम्राट १६८४ मध्ये गिमोणे येथे आला आणि मराठी राजा संभाजी महाराजांच्या शोधात तिथे राहिला. त्याच्या वास्तव्यादरम्यान, त्याने परिसरातील हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली.

जेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याला सम्राटाच्या मंदिर उद्ध्वस्त करण्याच्या योजनेची माहिती मिळाली, तेव्हा त्याने भगवान राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती एका गोठ्यात लपवून ठेवल्या. जेव्हा सम्राटाला हे कळले तेव्हा त्याच्या सैनिकांनी पुजाऱ्याला मूर्तींबद्दल विचारले, परंतु त्याने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. यामुळे सम्राटाने मंदिर उद्ध्वस्त करण्यापूर्वी पुजाऱ्याला ठार मारले, अशी माहिती च्यारी यांनी दिली.

मोगल सम्राट गेल्यानंतर, स्थानिकांनी या मंदिराची मोडतोड झालेली अवस्था पाहिली आणि त्यावर माती टाकून हे ठिकाण लपवण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांच्या माहितीनुसार १९८५ मध्ये उत्खननात सापडलेले हे अवशेष मूळ मंदिर म्हणून ओळखले गेले. उत्खननानंतर, भगवान राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तींचे मूळ स्थान सापडले, असे च्यारी यांनी पुढे सांगितले.

‘पुरातत्वची मदत घ्या’

या मंदिराचे पुनःनिर्माण व्हावे अशी इच्छा आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुरातत्व विभागाच्या मदतीने या मंदिराचे पुनःनिर्माण करावे, अशी मागणी रामभक्त करीत आहेत. उत्खननात सापडलेल्या राम, लक्ष्मण आणि सीतेच्या पिंडी सापडल्याने हेच मूळ मंदिर म्हणून स्थानिक भाविक तेथे पूजा अर्चा करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

IND vs SA ODI Series: द. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर; रोहित- विराट खेळणार की नाही? नव्या कर्णधाराचीही घोषणा

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

Smriti Mandhana: घरात लगीनघाई सुरु असतानाच आला हार्ट अटॅक! स्मृती मानधनाचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यता; पाहुणे परतले

SCROLL FOR NEXT