
हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वर मंदिरात मासिक पालखीवेळी पोलिसांनी भंडारी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली. हातात दांडे घेऊन मंदिरात शिरलेल्यांना संरक्षण दिले.
यावरून भंडारी समाजात मोठी खदखद निर्माण झाली आहे. त्यातून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवृत्त अधिकारी गुरुदास पिळर्णकर यांच्या अपक्ष उमेदवारीला भंडारी समाजाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. खुद्द पिळर्णकर यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.
समाजाचे अस्तित्व दाखवायचे असेल, तर लोकसभा निवडणुकीत समाजाने पाठिंबा दिलेला उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी भूमिका समाजातील काही नेत्यांनी घेतली आहे. हरवळेतील पालखी कार्यक्रमावेळी ४०-५० जणांचा जमाव तेथे आला होता. त्याविरोधात राज्यभरातून आलेले तीनेक हजार भंडारी बांधव मंदिर परिसरात होते.
जमावाने थोडा वेळ रेटारेटी केली, आवाज केला तरी भंडारी बांधवांनी त्याला प्रत्युत्तर दिले नाही. तेथे दांडे घेऊन आलेल्यांना पोलिसांनी संरक्षण दिले, मंदिर परिसरात पालखीवेळी घडलेला प्रकार हा सत्ताधारी पुरस्कृतच होता, असा आरोप बहुतांश भंडारी नेत्यांनी केला होता. आता हा विषय समजावून सांगण्यासाठी येत्या आठवड्यात पुन्हा विविध तालुक्यांत बैठका घेण्यात येणार आहेत.
गोमंतक भंडारी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी अशोक नाईक आहेत. त्यांनी नियमबाह्य पद्धतीने संघटनेच्या केंद्रीय समितीला मुदतवाढ घेतली. त्यांच्याविरोधात जनजागृती करण्यासाठी भंडारी समाजातील नेत्यांचा मोठा गट सध्या एकवटला आहे.
त्यानंतर हरवळे येथील श्री देव रूद्रेश्वर देवस्थानच्या मासिक पालखी सोहळ्यावेळी भंडारी बांधवांनी जमावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार सगळ्याच तालुक्यांतून भंडारी बांधवांनी रूद्रेश्वर मंदिराकडे धाव घेतली होती. त्यांच्यासमोर काहीजणांनी आवाज चढवण्याचा प्रकार घडला. त्यावेळी भंडारी नेत्यांनी आम्ही देवाचे दर्शन घेण्यासाठी कोणालाच बंदी घातलेली नाही.
मंदिरात जाणाऱ्याच्या डोक्यावर भंडारी आहे असे लिहिले आहे का हे तपासून मंदिरात प्रवेश दिला जात नाही, असा खुलासा केला होता. त्यावेळी समाज बांधवांच्या तीव्र भावना खुद्द मंत्री रवी नाईक यांच्या समक्षच व्यक्त झाल्या होत्या.
त्यानंतर हा वाद मिटवण्यात आला तरी तो समाजाला मान्य झालेला नाही. समाजाच्या अनेक नेत्यांना आमची ताकद दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे वाटू लागले आहे. त्यासाठी आता लोकसभा निवडणुकीचा पर्याय निवडला आहे.
एवढ्यात त्यांना सरकारी सेवेला कंटाळून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या गुरुदास पिळर्णकर यांच्याविषयी समजले. त्यांनी पिळर्णकर यांना तुमच्या लोकसभा अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देऊ, असे कळविले आहे.
गृहमंत्रीच जबाबदार
रुद्रेश्र्वर मंदिरात ज्या लोकांनी धुडगूस घातला त्यांनी यापुढे असा प्रकार पुन्हा करणार नाही, असे लिखित स्वरूपात द्यावे. मुळात हा प्रकार प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडला. कारण जमाव हातात दंडुके घेऊन तिथे आला होता. मात्र, पोलिस जमावाऐवजी भंडारी लोकांना बाहेर काढत होते. गृहमंत्री हेच या प्रकाराला जबाबदार आहेत, असे कांदोळकर म्हणाले.
रुद्रेश्र्वर मंदिरात ज्या लोकांनी धुडगूस घातला त्यांनी यापुढे असा प्रकार पुन्हा करणार नाही, असे लिखित स्वरूपात द्यावे. मुळात हा प्रकार प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडला. कारण जमाव हातात दंडुके घेऊन तिथे आला होता. मात्र, पोलिस जमावाऐवजी भंडारी लोकांना बाहेर काढत होते. गृहमंत्री हेच या प्रकाराला जबाबदार आहेत, असे कांदोळकर म्हणाले.
या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सहभाग नाही, असे म्हणणाऱ्यांचा खरा बोलविता धनी कोण? हा विषय संपूर्ण गोव्याचा आहे. त्यामुळे लिखित स्वरूपात हमी हवी की, तिथे पुन्हा कुणी बिगर भंडारी लोक मंदिरस्थळी गोंधळ घालणार नाहीत, जेणेकरून भविष्यात भावी पिढीला अडचण नसेल.
- किरण कांदोळकर, माजी आमदार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.