Mahashivratri: मुळगावातील वैभव! पुरातन मूर्तींसह शिवलिंगाची महाशिवरात्रीला होणार पूजा; पांडवकालीन कोरीवकाम असल्याची शक्यता

Ramnath Mulgao: मूळगावमधील ‘रामनाथ’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या स्थळावरील पाषाणी मूर्तींसह खडकावर कोरलेले 'शिवलिंग' अजूनही शाबूत आहे.
Pandava Era Shivlinga Ramnath Mulgao
Pandava Era Shivlinga Ramnath MulgaoDainik Gomantak
Published on
Updated on

Shivlinga Ramnath Mulgao Mahashivratri

डिचोली: मूळगावमधील ‘रामनाथ’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या स्थळावरील पाषाणी मूर्तींसह खडकावर कोरलेले 'शिवलिंग' अजूनही शाबूत आहे. या पुरातन मूर्ती आणि शिवलिंग नेमक्या कोणत्या शतकातील त्याबद्धल अजूनही नेमकी माहिती स्पष्ट झालेली नाही. तरी शिवलिंग आणि मूर्ती पांडवकालीन असाव्यात, अशी शक्यता स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे. तसा दावाही जाणकारांकडून करण्यात येत आहे.

सहाव्या शतकात पांडव गोमंतभूमीत आले होते. त्यावेळी त्यांनी मुळगावमध्ये शिवशंकराचे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शक्यताही जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. या स्थळावरील एकंदरीत कोरीव काम आणि खाणाखुणा पाहता, या दाव्याला महत्व असल्याचे स्पष्ट होत आहे.या धार्मिक स्थळी यंदा महाशिवरात्री साजरा करण्याची तयारी ग्रामस्थांनी सुरू केली असून, सध्या परिसराची साफसफाईही करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Pandava Era Shivlinga Ramnath Mulgao
Mahashivaratri: शिवरात्रीनिमित्त राज्यातील मंदिरे भाविकांनी फुलली, मुख्यमंत्री सावंत यांनी केली रुद्रेश्वर मंदिरात सेवा अर्पण

झरा नामशेष

मुळगावमधील या पुरातन वैभवाची माहिती समोर आल्यानंतर ‘रामनाथ’ या स्थळाकडे ग्रामस्थ श्रद्धेने धार्मिक स्थळ म्हणून पाहत आहेत. मध्यंतरी याठिकाणी लहानशे मंदिरही बांधून ग्रामस्थ याठिकाणी दिवावात पेटवत होते. या स्थळाजवळील झऱ्यावर स्थानिक आंघोळही करत होते, अशी माहिती मिळाली आहे. शिवलिंग आणि पाषाणी मूर्ती शाबूत असल्या तरी या धार्मिक स्थळाजवळील नैसर्गिक झरा मात्र आता गायब झाला आहे.

Pandava Era Shivlinga Ramnath Mulgao
Maha Shivratri: महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या तारीख, पूजा, विधी अन् शुभ मुहूर्त

शिवलिंग अन् नंदी

मुळगावच्या लोकवस्तीपासून काही अंतरावर खाणीच्या पायथ्याशी झाडीत आणि गावचे नैसर्गिक जलस्रोत असलेल्या तळ्याजवळ या पुरातन मूर्ती आजही शाबूत आहेत. शिवलिंग, नंदी आदी पाषाणी मूर्ती याठिकाणी आहेत. त्याचबरोबर जवळच खडकावर कोरलेले शिवलिंग आहे. पाषाणी मूर्ती आणि कोरलेले शिवलिंग पाहता शिवशंभू महादेवाचे मंदिर बांधण्याचा प्रयत्न झाला असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला आहे. सहाव्या शतकात ज्यावेळी पांडव डिचोली तालुक्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मुळगावमध्ये शिवशंकराचे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला असावा. नंतर पांडवांनी काही अंतरावरील मुळगावला जोडून असलेल्या लामगाव येथे गुंफा कोरली असावी, असे मुळगावचे माजी सरपंच वसंत गाड आणि नरेश परब यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com