Pissurlem Dainik Gomantak
गोवा

Pissurlem : स्वच्छतेच्या समर्पणाची दखल; रसिका खांडेपारकर यांचा उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

रसिका खांडेपारकर यांचा उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

दैनिक गोमन्तक डिजिटल

Pissurlem : पिसुर्ले येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतेचा मंत्र जपणाऱ्या रसिका खांडेपारकर यांना केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा कचरा व्यवस्थापनातील पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार, 4 मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सत्तरी तालुक्यासाठी हा विशेष गौरव असून हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे पिसुर्ले पंचायत क्षेत्रासह संपूर्ण राज्यातून रसिका यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे.

स्वच्छतेसाठी त्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्याचे आदेश दिले होते. त्याची दखल घेऊन यासंदर्भातील चाचपणी पंचायत खात्याने केली होती.

पिसुर्लेचे सरपंच देवानंद परब म्हणाले, या पुरस्कारामुळे पिसुर्ले पंचायतीची प्रतिष्ठा वाढली आहे. रसिका खांडेपारकर या प्रामाणिक कर्मचारी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या सफाई कामगार म्हणून काम करतात.

पिसुर्लेतून अशी झाली निवड

केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाच्या निर्देशानुसार पंचायत संचालनालयाने सर्व पंचायत क्षेत्रांतील सफाई कर्मचाऱ्यांचा सविस्तर अहवाल या पुरस्कारासाठी पाठवला होता.

पिसुर्लेचे सरपंच देवानंद परब यांच्या पुढाकाराने सचिव दयेश मुरगावकर यांनी पिसुर्लेत सफाई कर्मचारी म्हणून सेवा बजावणाऱ्या पणसे-सत्तरी येथील रसिका खांडेपारकर यांची निवड करून अहवाल मंत्रालयाला पाठवला होता.

त्याप्रमाणे राज्यातील सर्व अहवालांची छाननी करून रसिका यांची निवड करण्यात आली.

"मी एक गरीब सफाई कामगार आहे; मी माझी सेवा प्रामाणिकपणे बजावत आहे. प्रामाणिक सेवेचे फळ म्हणून मला पुरस्कार प्राप्त झाला आहे, याबद्दल ईश्वराचे आभार! पिसुर्ले पंचायतीनेही माझ्या कामाची दखल घेतली त्याबद्दल त्यांचीही मी ऋणी आहे."

- रसिका खांडेपारकर, पिसुर्ले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT