Goa Crime News : डॉ. श्रीकांत वेरेकर हत्‍या प्रकरण; लव्ह ट्रॅप, सूड, खून, फाशी, जन्‍मठेप आणि सुटकेची कहाणी

18 वर्षांनंतर आरोपी जावई जेलमुक्‍त
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News : वास्कोत 18 वर्षांपूर्वी डॉ. श्रीकांत वेरेकर यांच्या खूनप्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली होती. त्‍यातील आरोपी तथा त्‍यांचा जावई रायन फर्नांडिस याची सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली आहे.

सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेत घट करत खंडपीठाने त्याला जन्मठेप सुनावली होती. घटनेपासून म्हणजे जवळपास 18 वर्षांपर्यंत तो कारागृहातच होता.

सासऱ्याच्या खूनप्रकरणी कोलवाळ येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपी रायन फर्नांडिस याने पूर्वसुटकेसाठी अर्ज केला होता.

गृह खात्याच्या पूर्वसुटका समितीने त्याच्या अर्जावर पोलिस खात्याकडून चौकशी अहवाल मागितला होता. त्याची सुटका झाल्यावर कुटुंबाने स्वीकारण्याची तयारी दाखवली असल्याचा अहवाल दिला होता.

Supreme Court
Goa Crime News : डॉ. वेरेकरांचा काटा काढण्‍यासाठी विषारी सापाचा वापर!

मात्र, गृह खात्याच्या पूर्वसुटका समितीने 16 जून 2021 रोजी त्याचा अर्ज फेटाळला होता. त्याला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, मांगूरहिल येथील प्रसिद्ध डॉ. श्रीकांत वेरेकर यांचे 2005 साली अपहरण करून खून करण्‍याचे प्रकरण राज्‍यात खूपच गाजले होते.

अशी झाली रायनची सुटका

14 वर्षे शिक्षा भोगलेल्या आरोपींच्या कारागृहातील वर्तणुकीवरून त्यांच्या पूर्वसुटकेसाठी गृह खात्याकडे यादी पाठवली जाते. या खात्याच्या पूर्वसुटका समितीकडून त्याची तपासणी झाल्यानंतर त्यावर निर्णय होतो.

रायन फर्नांडिस याला कारागृहात 14 वर्षे पूर्ण झाली होती. त्याचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध कारागृहात असताना कोणत्‍याही प्रकारच्‍या गुन्हेगारी कारवायांचा ठपका नाही.

तरीही त्याचा पूर्वसुटका अर्ज फेटाळला गेला होता. समितीने फेटाळलेला हा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून त्याची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.

Supreme Court
Online Chatting वर चुकूनही 'या' 5 गोष्टी करू नका, नाहीतर नात्यात येईल दुरावा

अपमानित केल्याने खून

सासऱ्याने अपमानित केल्याने रायनने सूड घेण्यासाठी त्याने काही गुंडाची मदत घेतली. डॉ. वेरेकर हे 17 जानेवारी 2005 साली सकाळी मांगोर हिल-वास्को येथे रस्त्यावरून मॉर्निंग वॉकला गेले असता रायन व गुंडांनी त्यांचे ओमनी गाडीमधून अपहरण केले होते.

त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून करत मृतदेह वेर्णा येथे निर्जनस्थळी टाकून ते पसार झाले होते. या गुन्ह्यामध्ये रायन याच्यासह फ्रांसिस्को ऊर्फ फ्रांसिस ग्रेगोरिओ पॉल डिसोझा, राजेंद्र ऊर्फ राजन सिंग व सचिन परब तसेच प्रथमेश गदगकर याना अटक झाली होती. गदगकर माफीचा साक्षीदार झाल्याने त्याची सुटका झाली होती.

प्रेमाची भुरळ नडली

आरोपी रायन फर्नांडिस याने डॉ. श्रीकांत वेरेकर यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी नोंदणीपद्धतीने विवाह केला होता. याला वेरेकर कुटुंबीयांचा विरोध होता.

लग्नानंतर काही दिवसांच रायनच्या त्रासाला कंटाळून वेरेकर यांची मुलगी घरी परतली. त्यानंतर रायन व डॉ. वेरेकर यांच्यात वाद झाला. रायन पत्नीला आणण्यास गेला असता वेरेकरांनी त्याला अपमानित करून हाकलून लावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com