Goa Budget 2023: गोवा सरकारच्या अर्थसंकल्पाकडून तुम्हाला काय पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी लोकांकडून मागविल्या सूचना

गोवा विधानसभेचे 2023-24 वर्षासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 मार्चपासून सुरू होणार आहे.
Goa Budget 2023-24
Goa Budget 2023-24Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Budget 2023: गोवा विधानसभेचे 2023-24 वर्षासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 मार्चपासून सुरू होणार आहे. एक आठवडा हे अधिवेशन चालणार असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली.

सचिव उलमन यांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेचे अधिवेशन 27 ते 31 मार्च पर्यंत चालेल. 31 मार्च हा खाजगी सदस्य दिवस असेल. या दिवशी विधानसभा सदस्य आपले खाजगी ठराव सूचना मांडू शकतात. तर अन्य दिवशी नियमित प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, शून्य प्रहर आणि चर्चा होईल.

दरम्यान, या अर्थसंकल्पासाठी मुख्यमंत्री सांवत यांनी लोकांकडून सूचना मागविल्या आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत रात्री उशीरा याबाबत ट्विट करून याबाबत माहिती दिली.

गोवा सरकार 2023-24 वर्षाच्या अर्थसंकल्पसाठी लोकांकडून सूचना आणि नवसंकल्पना मागवत आहे. अर्थसंकल्प हा लोकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब असावा असा माझा विश्वास आहे. म्हणून मी प्रत्येकाला त्यांच्या सूचना शेअर करण्याचे आवाहन करतो. यामुळे सरकारला बळकटी देणारा सार्वजनिक-केंद्रित अर्थसंकल्प तयार करण्यास मदत होईल.

गोवा सरकारच्या Goa Online या संकेतस्थळावर नोंदणी करून, 2023-24 साठी सर्वसमावेशक बजेट तयार करण्यासाठी एकत्र काम करूया. असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे.

Goa Budget 2023-24
गोव्यातील तरुणाचा लंडनमध्ये अपघाती मृत्यू ; केन्सिंग्टन हाय स्ट्रीटवर झाला अपघात

दरम्यान, गोवा ऑनलाईन संकेतस्थळ आज संध्याकाळी काहीकाळासाठी बंद राहणार आहे. गोवा सरकाराचे संकेतस्थळ दि. 03 मार्च रोजी, संध्याकाळी 06:45 ते 08:30 यावेळेत मेन्टेनन्स कामासाठी बंद राहणार आहे.

खाजगी सदस्य दिवसासाठी 16 मार्चपूर्वी आमदारांनी आपले ठराव, विधेयक सादर करावेत असे म्हटले आहे. 27 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या दक्षता, सामान्य प्रशासन, विमानतळ, शिक्षण, माहिती आणि प्रसिद्धी, वजन मापे, कौशल्य विकास या खात्यांसंबंधीचे प्रश्न चर्चेला येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly Monsoon Session 2026
Pramod Sawant Convoy Accident
home minister amit shah reviews goa st reservation file
cm pramod swant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com