Goa Rape Case Dainik Gomantak
गोवा

Goa Rape Case: जाहिरातीसाठी संधी देण्याचे आमिष दाखवून; मॉडेल तरूणीवर बलात्कार...

पटनीला 5 दिवसांची कोठडी

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये एका मॉडेल तरुणीशी मैत्री करून तिला पेयात गुंगीचे पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी महिला पोलिसांनी अटक केलेल्या संशियत राजेश पटनी याला आज न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.

रिअल इस्टेट क्षेत्रातील जाहिरातीसाठी संधी देण्याचे आमिष दाखवून संशयिताने हे कृत्य केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी व संशयित राजेश पटनी या दोघांची वैद्यकीय तपासणी झाली आहे.

पीडितेसोबत गोव्यात मॉडेल शूटिंगसाठी आलेल्या गटातील इतर सदस्यांची जबानी नोंदवण्यात येत आहे. संशयितांची पार्श्‍वभूमी तपासून पाहण्यात येत असून अजमेर येथील पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला आहे. हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांच्याही जबान्या नोंदल्या आहेत.

संशयित राजेश पटनी हा मूळचा अजमेर (राजस्थान) येथील असून गेल्या काही महिन्यांपासून तो गोव्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्नरत होता. पीडिता ही गोव्यात मॉडेल शूटिंगसाठी आलेल्या एका गटासोबत आली होती. हा गट एका पबमध्ये रात्री पार्टीसाठी गेला असता तिथेच त्यांची ओळख झाली.

सोबत पेय घेताना संशयिताने नकळत पेयात गुंगीचे औषध घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने पणजी महिला पोलिस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संशयिताचा मोबाईल पीडितेला माहीत असल्याने पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे शोध घेऊन अटक केली. आज त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची कोठडी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT