Goa Tiger Project: गाव, घरे, शेतजमिनी वगळूनच व्याघ्रक्षेत्र करा; वेळूस ग्रामस्थांचा आग्रह

सत्तरीच्या ग्रामीण भागात लोक वस्ती असून गाव, मंदिरे, घरे, रस्ते, उत्पन्नाच्या जागा तथा शेतजमिनी वगळूनच व्याघ्र क्षेत्र करावे अशी मागणी नागरिकांनी केली.
Tiger Project
Tiger ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tiger Project: येणारा काळ हा सत्तरीच्या जनतेच्या अस्तित्वाचा बनलेला आहे. कारण म्हादई अभयारण्या बरोबरच आता व्याघ्र क्षेत्राचे मोठे महासंकट लोकांवर येणार आहे. त्यामुळे सत्तरीच्या जनतेने आतातरी कोणाच्या दबाबाखाली न येता स्वत:च्या अस्तित्वासाठी लढा दिला पाहिजे. अन्यथा आपली पुढची पिढी आम्हाला दुषणे देईल.

Tiger Project
Bhausaheb Bandodkar यांनी सुरु केलेली साक्षरता मोहिम गोव्याच्या समृद्धतेसाठी आवश्‍यक- रवी नाईक

सत्तरीच्या ग्रामीण भागात लोक वस्ती असून गाव, मंदिरे, घरे, रस्ते, उत्पन्नाच्या जागा तथा शेतजमिनी वगळूनच व्याघ्र क्षेत्र करावे, असा सूर वेळूस वाळपई येथे सातेरी मंदिराच्या सभामंडपात आयोजित व्याघ्र क्षेत्र, म्हादई अभयारण्य या परिसंवादात विविध जागृत नागरिकांनी आळवला.

रविवारी सकाळी झालेल्या या परिसंवादात सत्तरीतील विविध भागातील ग्रामस्थांनी सहभागी होऊन आपली मते मांडली.

Tiger Project
Banastarim Bridge Accident: दिवाडीवासीयांचा मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय

सामाजिक कार्यकर्ते ॲड. गणपत गावकर म्हणाले २४ जुलै रोजी उच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशानुसार सरकारला तीन महिन्यांत व्याघ्र क्षेत्राविषयी कार्यवाही करावी, असे बजावल्याने सत्तरीत भीती परसली आहे. १९९९ साली म्हादई अभयारण्यानंतर आता व्याघ्रक्षेत्र हे लोकांच्या अस्तित्वावरचे संकट बनले आहे.

म्हादई अभयारण्य क्षेत्रातील गावे

  • डोंगुर्ली पंचायत : डोंगुर्ली, हिवरे, हिवरे बुद्रुक, गोळावली, सुर्ला, पाली, चरावणे, नानेली.

  • खोतोडा : सुरुंगुली, शिरसोडे, गवाणे, असोडे.

  • सावर्डे : कडवळ, करंझोळ, पेंडाळे, झाडानी.

  • नगरगाव : ब्रम्हाकरमळी, नानोडे, शिंगणे, शेळप बुद्रुक, वायंगिणी, कोदाळ, साट्रे, देरोडे.

  • म्हाऊस : झर्मे, दाबे 1, दाबे 2, कोपार्डे.

  • मोर्ले : पणसुले.

  • केरी : केळावडे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Kali Tiger Reserve Hunting Case
Talaulim Village tourism
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Bhagur Village
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com