Banastarim Bridge Accident: दिवाडीवासीयांचा मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय

दिवाडीवासीयांची बैठक: बाणस्तारी अपघात; सावर्डेकरला शिक्षा व्हावी, मागणीवर ठाम
Banastarim Bridge Accident
Banastarim Bridge AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी येथील भीषण अपघातातील मुख्य आरोपी परेश सावर्डेकर याला शिक्षा व्हावी, यासाठी दिवाडीवासीय कुंभाजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहेत. काल मळार येथील साव मथाएस पंचायतीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला आमदार फळदेसाई आणि सुमारे 200 हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Banastarim Bridge Accident
Bhausaheb Bandodkar यांनी सुरु केलेली साक्षरता मोहिम गोव्याच्या समृद्धतेसाठी आवश्‍यक- रवी नाईक

अपघात मुड्डी, दिवाडीतील फडते कुटुंबातील दाम्पत्य सुरेश आणि भावना फडते यांचा मृत्यू झाल्यानंतर दिवाडी बेट आणि संबंध राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. पुढील वाटचाल निश्चित करण्यासाठी काल बैठक झाली होती. त्यात फळदेसाई यांनी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, अशी सूचना केली. मुख्यमंत्री सोबत राहतील, कारण आपली सत्याची बाजू आहे, असा फळदेसाई यांनी विश्वास दर्शवला.

केंद्रीयमंत्र्यांकडून सांत्वन

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि हळदोणेचे आमदार ॲड.कार्लुस फेरेरा यांनी आज दिवाडीतील फडते कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. परेश सावर्डेकरला शिक्षा झाली पाहिजे, असे सांगून श्रीपाद नाईक यांनी सुरेश फडते यांचे वडील विनायक फडते यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तर आता अपघाताचा खटला चालणार असून कोणतीही कायदेशीर मदत लागतल्यास संकोच न करता आपल्याला सांगा, असे फेरेरा यांनी सुरेश फडते यांचे पुत्र साहील फडते यांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीची प्रतीक्षा

बाणस्तारी येथे भीषण अपघातात मृत्यू झालेल्या सुरेश आणि भावना फडते यांच्या कुटुंबाला अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. परंतु मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी साहील फडते यांचे फोन करून सांत्वन केले आहे. मंत्री, आमदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी भेट दिली आहे. तर मुख्यमंत्री कधी भेट देणार, याची वाट दिवाडीवासीय बघत आहेत.

Banastarim Bridge Accident
Goa Agriculture: सायपे तळे शेतातील प्रस्तावित रस्त्याला नागरिकांचा विरोध

...तर बाजू कमकुवत !

अपघात केल्याचा आरोपी परेश सावर्डेकर असला, तरी मर्सिडीज त्याची पत्नी मेघना चालवत होती, असे दावे करण्यात आले आहेत. बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर वकील रवीराज चोडणकर यांनी सांगितले,की मेघनाला आपण मुख्य आऱोपी करण्याचा सल्ला दिला, परंतु पोलिसांनी मेघनाची मद्य चाचणी देखील केली नव्हती. त्याशिवाय स्टेअरिंगवरील हाताचे ठसे देखील घेतले गेले नसून आपली बाजू कमकुवत होईल,असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com