Ramesh Tawadkar Meet Ashwini Vaishnaw Dainik Gomantak
गोवा

Canacona News: तवडकरांची दोन दिवसांत दोन मंत्र्यांची भेट; आता रेल्वेमंत्र्यांनी दिले मोठे आश्वासन

सभापती तवडकरांनी रेल्वे मंत्री आश्वीनी वैष्णव यांना सादर केले निवेदन

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News: सभापती रमेश तवडकर यांनी दिल्लीत रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन सादर केले. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी रेल्वेमंत्र्यांनी काणकोण रेल्वे स्थानकावर तीन पैकी दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचे आश्वासन सभापती तवडकर यांना दिले. या भेटीवेळी नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर व गोवा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष शंभा नाईक गावकर उपस्थित होते.

सभापती तवडकर यांनी रेल्वे मंत्र्याना मोपा विमानतळामुळे काणकोणच्या पर्यटनावर परिणाम झाला आहे. त्यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा देणे पर्यटक व स्थानिकांच्या रहदारीसाठी महत्वाचे असल्याचे रेल्वे मंत्र्याना पटवून दिले.

यावेळी रेल्वे मंत्री वैष्णव यांनी तीन गाड्यां पैकी दोन गाड्यांना ताबडतोब थांबा देण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित एका गाडीला थांबा देण्यासाठी दोन ते तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सभापतीना सांगितले.

सद्या या मार्गावरील काही रेल्वे गाड्या ६ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत मंगळूर सेक्टर मध्ये रेल्वे मार्गाचे नुतनीकरण करण्यात येत असल्याने बंद आहेत.

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा देणे ही काळाची गरज होती. त्यासाठी काणकोणवासीयांनी करोना महामारीनंतर प्रयत्न चालू केले होते.

मात्र सभापतींनी प्रत्यक्ष रेल्वे मंत्र्याची दिल्लीत भेट घेऊन ही मागणी पूर्ण केली असल्याचे नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी सांगितले.

यावेळी गोवा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष शंभा नाईक देसाई यांनी या प्रयत्नांबद्दल सभापतीचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

SCROLL FOR NEXT