CM Pramod Sawant : 'नमो' सारखं आता 'सीएम ॲप', मुख्यमंत्री सावंत यांचे पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल

सरकार स्वयंपूर्ण ॲप किंवा सीएम ॲप विकसित करण्याच्या विचाराधीन
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Cm Of Goa : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो ॲप लॉन्च केला होता. त्या ॲपच्या धर्तीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आता सीएम ॲप लॉन्च करणार आहेत. सरकार स्वयंपूर्ण ॲप किंवा सीएम ॲप विकसित करण्याच्या विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात तालुका नोडल अधिकारी आणि 'स्वयंपूर्ण मित्र यांच्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी याबाबतची माहिती दिली.

CM Pramod Sawant
Goa Mining : खाण उद्योगावर अवलंबून असलेल्यांना झटका; लिलाव प्रक्रियेला आव्हान

या ॲपमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार आणि अधिकारी त्यांनी केलेल्या कामाची अपडेट करतील त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाची माहिती इतरांना मिळविणे सोपे होईल.

सरकारच्या योजना तळागाळात तसेच अंतोद्य तत्वावर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांची नेमणूक केली आहे. त्यांनाही या ॲपचा फायदा होणार आहे.

स्वयंपूर्ण मित्रांना विविध पंचायतींमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या पध्दती जाणून घेण्यास व त्यांची अंमलबजावणी करण्यास मदत होणार आहे. तसेच या ॲपवर स्वयंपूर्ण मित्र त्यांचे नित्य उपक्रम अपडेट करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Economic Discipline
Goa Surla Farmers Compensation
Goa CM Pramod Sawant accident help
Goa ST Political Reservation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com