Goa Rajyasabha Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Rajyasabha Election: खा. विनय तेंडुलकर यांची राज्यसभेची मुदत 'या' दिवशी संपणार; 23 जुलैला निवडणूक शक्य

गोव्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी 'या' नावाची चर्चा

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Rajyasabha Election 2023: गोव्यातून राज्यसभेवर निवडून गेलेले भाजपचे खासदार विनय तेंडुलकर यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता गोव्यातून कोण जाणार? भाजपमधून राज्यसभेसाठी कुणाला संधी मिळणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

गोव्यातून लोकसभेत दोन तर राज्यसभेत एक खासदार निवडून जातो. पैकी उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यातून काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन हे लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर भाजप नेते विनय तेंडुलकर हे गोव्यातले राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत.

खासदार विनय तेंडुलकर यांचा राज्यसभेचा 6 वर्षांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. 31 जुलै 2017 रोजी ते राज्यसभेवर निवडून गेले होते. तेंडुलकर यांची खासदारकीची मुदत येत्या 28 जुलै रोजी संपत आहे.

म्हणजेच केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे तेंडुलकर यांच्यानंतर गोव्यातून राज्यसभेवर भाजपकडून कुणाची वर्णी लागणार, याची चर्चा आता गोव्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

गोव्यातील राज्यसभेच्या जागेसाठी 23 जुलै रोजी निवडणूक होऊ शकते. दरम्यान, गोवा विधानसभेत भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याने या जागेवर भाजपचाच उमेदवार निवडून येणार हे नक्की आहे.

तथापि, तेंडुलकर यांच्यानंतर भाजपमधून कोण याचीच उत्सुकता असणार आहे. यात भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे समजते.

खा. विनय तेंडुलकर हे राज्यसभेवर पुन्हा जाण्यासाठी इच्छूक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजपकडून विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना या जागेवर संधी मिळू शकते. विशेष म्हणजे तेंडुलकर हे देखील खासदार होण्यापुर्वी प्रदेशाध्यक्षच होते.

पुन्हा प्रदेशाध्यक्षांना संधी मिळणार?

राज्यसभेवर निवडून जाण्यापुर्वी विनय तेंडुलकर हे गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. 2012 ते 2020 असे सलग दोन टर्म त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली होती. तेंडुलकर राज्यसभेवर निवडून गेल्यावर तीन वर्षांनी 12 जानेवारी 2020 रोजी सदानंत शेट तानावडे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले.

तानावडे यांचे राज्यातील सर्व भाजप नेत्यांची उत्तम संबंध आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह या नेत्यांची त्यांना उत्तम साथ मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला! आदिवासी महिलेला गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांवर टाळाटाळ केल्याचा आरोप

Iran Attack US Military Base: मिडल ईस्टमध्ये युद्धाचा भडका! इराणचा जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी बेसवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; 'पॅट्रियट' सिस्टीम फेल

Santinez Creek: पणजी, ताळगावच्या प्रदूषणाचा 'सांतिनेज खाडी'ला विळखा

चुकीला माफी नाही! ITR भरताना 'या' 10 चुका केल्यास थेट येऊ शकते आयकर विभागाची नोटीस; करदात्यांनो, वेळेत सावध व्हा

भारतीय क्रिकेटमध्ये ऑल इज नॉट वेल! रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटमधील वादाचे एकामागून एक खुलासे; आणखी एका रिपोर्टनं खळबळ

SCROLL FOR NEXT