Goa Taxi  Dainik Gomantak
गोवा

Mopa : ‘मोपा’वर लवकरच टॅक्सी काऊंटर : राजेश नाईक

ग्रीनफिल्ड टॅक्सी संघटनेला आश्‍वासन

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोपा विमानतळावर स्थानिकांना टॅक्सी काऊंटर देण्याची आणि ते अधिसूचित करण्याची प्रक्रिया शक्य तितकी लवकर पूर्ण करू, असे आश्वासन वाहतूक खात्याचे पेडणे कार्यालयातील सहाय्यक अधिकारी राजेश नाईक, सहाय्यक अधिकारी प्रल्हाद देसाई यांनी ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.

पेडणे वाहतूक खात्याच्या कार्यालयात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष भास्कर नारुलकर, ॲड जितेंद्र गावकर, ॲड प्रसाद शहापूरकर, भारत बागकर, सुरेश परब, संजय आरोसकर, नंदकुमार मावळणकर आदी टॅक्सी व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी भास्कर नारुलकर यांनी संघटनेच्यावतीने राजेश नाईक व प्रल्हाद देसाई यांच्याशी चर्चा केली.

गेले सहा महिने पेडणेतील टॅक्सी व्यावसायिकांना त्यांच्या हक्काचा असलेला टॅक्सी स्टॅण्ड मोपा येथील विमानतळावर मिळावा यासाठीची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, सरकार याबाबत आजवर चालढकल करत आले आहे. टॅक्सी काऊंटरसंबंधीची ही प्रक्रिया तातडीने पुढे न्यावी, अशी मागणी नारुलकर यांनी यावेळी केली.

नारुलकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मोपा विमानतळावर टॅक्सी काउंटर देण्यासाठी गेले अनेक महिने आमचे आंदोलन सुरू आहे. सरकारने टॅक्सी काउंटर अधिसूचित करून ते देण्यासाठी जल गतीने कृती करावी. सरकारने मोपा प्रकल्पपीडितांना त्यांच्या हक्काचे काम देऊन न्याय द्यावा.

भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी जीएमआर कंपनीकडे संपर्क साधून महाराष्ट्रातील दीड हजार गाड्या मोपा विमानतळावर आणणार आहेत. अशी माहिती पुढे येत असून आमदारांना याबाबत काहीच कसे काय माहीत नाही, याचे आश्‍चर्य वाटते.

-ॲड जितेंद्र गावकर

मोपा विमानतळावरील टॅक्सी काऊंटर बाबत सुरू असलेला जो भेदभाव सुरू आहे तो आधी बंद व्हायला हवा. सरकारने आता जलद गतीने टॅक्सी काऊंटर पेडणेकरांना द्यायला हवे.

-ॲड. प्रसाद शहापूरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT