Bicholim : कुडणे येथे सोमवारी प्रसिद्ध ‘होमकुंड’ जत्रोत्सव

श्री महालक्षमी देवस्थानतर्फे आयोजन : गोबी मंच्युरियनच्या दुकानांना जत्रेत प्रतिबंध
festival
festivaldainik gomantak
Published on
Updated on

डिचोली : कुडणे येथील श्री देवी महालक्ष्मी कुडणेश्वर देवस्थानचा प्रसिद्ध होमकुंड जत्रोत्सव येत्या सोमवारी (ता. १०) साजरा करण्यात येणार आहे. यंदा जत्रोत्सवात गोबी मंच्युरियनची दुकाने थाटण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. जत्रोत्सवात गोबी मंच्युरियनची दुकाने आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचेही समितीने ठरविले आहे.

सोमवारी पहाटे ५.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत श्रींच्या मूर्तीस अभिषेक आदी विधी होणार आहेत. संध्याकाळी ४ वाजता नवीन धोंडगण मानवण, ६ वाजता श्रीचे सातेरी देवीच्या तळीवर स्नान करण्यासाठी आगमन होणार आहे. रात्री ११ वाजता हरवळे येथील श्रीदेव रुद्रेश्वराकडून भेटीच्या रूपाने आलेल्या ओटीचा स्वीकार करण्यात येणार आहे.

festival
Canada Hindu Temple Vandalised: कॅनडात पुन्हा एकदा हिंदू मंदिराची तोडफोड, भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा!

पहाटे २ वाजता होमकुंड प्रज्वलित केल्यानंतर धोंडगणांचे स्नान करण्यासाठी सातेरी देवीच्या तळीवर प्रस्थान होणार आहे. पहाटे चार वाजता श्री रवळनाथ व देवी महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने धोंडगण पेटत्या हुमकुंडातून अग्निदिव्य करणार आहेत. पहाटे ५.३० वाजता श्रींचे अग्निदिव्य झाल्यानंतर मंडपात सर्वांना कौल देऊन मुख्य जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.

नाट्य महोत्सवाचे आयोजन

जत्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 11\) रात्री अकरा वाजता ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. 12) रात्री 11 वाजता ‘अयोध्येचा ध्वजदंड’ हे नाटक होणार आहे. गुरुवारी (ता. 13) रात्री 11वाजता ‘वन टू का फोर’ हे कोकणी नाटक सादर करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. 14) संध्याकाळी 7 वाजता श्री कुडणेश्वर नूतन मंदिर बांधकाम निमित्ताने काढण्यात आलेल्या मदत निधी कुपनांचा निकाल होणार आहे. नंतर ऑर्केस्ट्रा सादर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com