गोवा

Goa Politics: राजभवन बनले चर्चेचे केंद्र

Goa Politics: राज्यपालांचा वाढदिन: अनेक नेत्यांची उपस्थिती; राजकीय चर्चा रंगली

दैनिक गोमन्तक

Goa Politics: सध्या सत्ताधारी व विरोधी तंबूत राज्यात अस्वस्थता आहे. त्याची मोठी चर्चा मिळेल तिथे सध्या सुरू आहे. तटस्थ समजले जाणारे राजभवनही या चर्चेपासून दूर राहू शकले नाही. राजभवनावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या अनेकांच्या तोंडी आता पुढे काय असाच प्रश्न होता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, राजशिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार आल्टन डिकॉस्ता, आमदार दिगंबर कामत आदींनी आज राजभवन गाठले. तेथील बैठक कक्षात आणि राज्यपालांच्या कक्षातही चर्चा ही राजकीयच होती. राजकारणातील चढउताराचा लेखाजोगा तेथील चर्चेत मांडला जात होता.

राजभवनावर आलेल्या समाजातील इतर मान्यवरांनाही या चर्चेत रस असायचा. ते अगदी कान टवकारून प्रतीक्षा कक्षातील ही चर्चा ऐकत होते. एरव्ही राजभवन हे राजकीय हालचालींचे बहुतेकवेळा केंद्र बनते. सगळ्या नजरा राजभवनवर खिळून असतात, पण आज राजभवनाच्या भिंतींनी बरीच राजकीय चर्चा ऐकली आहे. त्यात मंत्रिमंडळातील संभाव्य बदलाच्या विषयाचाही अपवाद नव्हता.

युरी आलेमाव यांची प्रत्यक्षातील भेट 15 मिनिटांसाठी ठरली होती. मात्र, अशा या चर्चेतून ती अर्धातास कशी चालली कोणालाच समजले नाही. येत्‍या दोन चार दिवसांत महत्त्वाच्या राजकीय हालचाली होतील हे वाक्य मात्र या चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

राजकीय हालचाली होणार गतिमान

राज्यपाल रात्री पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी दाबोळी विमानतळावरून कोची येथे रवाना झाले. रविवारी त्यांचे केरळमध्ये कार्यक्रम आहेत. ते सोमवारीच तातडीने परत येणार असल्याने मंगळवारपासून राजकीय हालचाली गतिमान होतील असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT