Goa Monsoon Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: राज्यात पाऊस पोहोचला 110 इंचांवर

यलो अलर्ट जारी : सांगेत सर्वाधिक 124 तर मुरगावात 92 इंच बरसात

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Update: पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारली असून गेल्या महिन्याभरात केवळ राज्यात 10 इंच पाऊस पडला आहे. सध्या राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाने कूर्मगतीने 110 इंचांचा टप्पा गाठला आहे.

जुलै महिन्यात रिकॉर्ड ब्रेक बरसलेल्या पावसाची नंतर गती मंदावली आहे. राज्यात १२ ऑगस्ट रोजी पावसाचे शतक पूर्ण झाले होते, त्यानंतर १० इंच पाऊस पूर्ण व्हायला २६ दिवस लागले. राज्यात आतापर्यंत एकूण २८०२.८ मि.मी. (११० इंच) पावसाची नोंद करण्यात आली असून सरासरीपेक्षा १ टक्का अधिक पाऊस पडला आहे. राज्यातील मुरगाव आणि दाबोळी केंद्र वगळता सर्व केंद्रांवर १०० इंचाहून अधिक पाऊस पडला असून सर्वाधिक १२४ इंच पाऊस सांगेत बरसला आहे.

आतापर्यंतचा एकूण पाऊस (इंचात)

  • म्हापसा १०८

  • पेडणे ११२

  • फोंडा ११५

  • पणजी १०५

  • जुने गोवे १०७

  • साखळी १०९

  • काणकोण १०२

  • दाबोळी ९५

  • मडगाव ११०

  • मुरगाव ९२

  • केपे १२३

  • सांगे १२४

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT