Illegal Sand Mining: सावर्डेत सात होड्या जप्त, बेकायदेशीर रेती उपशाविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई

बेकायदेशीर रेती उपशाविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा धडाका लावला आहे.
Illegal Sand Mining
Illegal Sand MiningDainik Gomantak

Illegal Sand Mining: बेकायदेशीर रेती उपशाविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी शिमेर येथे रेती व रेती वाहतूक करणारे ट्रक जप्त करण्यात आले होते. नंतर लगेच कुडतरी येथे आणखी एका केलेल्या कारवाईत होड्या व सक्शन पंप जप्त केले होते.

Illegal Sand Mining
Mapusa Municipality: म्हापसा नगरपालिकेतर्फे लवकरच कचरा व्यवस्थापनासाठी निविदा

अशीच कारवाई गुरुवारी (ता.७) रात्री कुडचडे पोलिसांनी सावर्डे येथे झुआरी नदीच्या काठी लपवून ठेवलेला एक सक्शन पंप व सात होड्या जप्त केल्या.

दक्षिण गोव्यातील सावर्डे येथे झुआरी नदीत बेकायदेशीर रेती काढली जात आसल्याची कुडचडे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार, गुरुवार, ७ रोजी रात्री केपेचे उपअधीक्षक नीलेश राणे यांनी कुडचडे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक वैभव नाईक व इतर पोलिसांच्या सहकार्याने बोटीद्वारे झुआरी नदीत जाऊन पाहणी केली.

Illegal Sand Mining
Accidetal Death: कामगाराच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कंपनीकडून नुकसानभरपाई

त्यावेळी रेती काढताना कुणीही आढळून आले नाही. मात्र, नंतर शोध घेतला तेव्हा लपवलेल्या होड्या सापडल्या.

नदीकाठी झुडपात लपवलेल्या होड्या

नदी परिसराची पोलिसांनी पाहणी केली असता नदीच्या काठी झुडपात सात होड्या व एक सक्शन पंप लपवून ठेवल्याचे आढळून आले. याची माहिती केपेचे ममलेदार प्रतापराव नाईक गावकर यांना दिली असता त्यांनी तेथे जाऊन पंचनामा केला आणि सक्शन पंप व होड्या बंदर कप्तान खात्याकडे सुपुर्द केल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com