Goa Rain | Skymet  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोव्यात पुढील 3 दिवसही पावसाचे; स्कायमेटचा अंदाज

गेल्या 24 तासांत राजधानी पणजीमध्ये 99.4 मिलीमीटर पाऊस

Akshay Nirmale

Goa Rain: गोव्यात गेल्या 24 तासात गडगडाटी पाऊस झाला. दरम्यान, गोव्यात आगामी तीन दिवसही पावसाचे असणार आहेत. स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे.

त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या सुरवातीला गोव्यात पाऊस असणार आहे. राज्याच्या सर्वच भागात मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. तर मध्यवर्ती भागात मुसळधार पाऊस झाला. गेल्या 24 तासांत राजधानी पणजीमध्ये 99.4 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

ओल्ड गोव्यात 57 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा येथे 44 मिमी पाऊस झाला. आज, बुधवारी 08 नोव्हेंबर रोजी पावसाच्या आणखी सरी अपेक्षित आहेत. काही ठिकाणी जास्त मुसळधार सरी कोसळू शकतात. त्यानंतरचे 2 दिवस पाऊस कमी होईल.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि किनार्‍यावरील चक्रीवादळामुळे अवकाळी पाऊस सुरू झाला. सामान्यत: नैऋत्य मोसमी पावसाच्या माघारीनंतर अशा जोरदार सरी पडतात. गोव्यात नोव्हेंबरमध्ये सरासरी 21.3 मिमी पाऊस पडतो.

अरबी समुद्रावरील चक्रीवादळ संथ गतीने असले तरी किनार्‍यापासून दूर सरकेल. त्यामुळे आज आणि उद्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा आहे. त्यानंतर त्याची गती मंदावेल. 11 नोव्हेंबरपासून हवामान चांगले राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

SCROLL FOR NEXT