Er Rahul Deshpande  Dainik Gomantak
गोवा

Goa: 'घर खरेदी गोमंतकीयांच्या आवाक्याबाहेर, दर 666% वाढले', राहुल देशपांडेंचे प्रतिपादन; ‘स्वयंपोषक विकास व गोवा’ सादरीकरण

Er Rahul Deshpande: ‘गोमन्तक’च्या अभियांत्रिकी नैपुण्यता पुरस्कार वितरण सोहळ्यात सोमवारी देशपांडे ‘स्वयंपोषक विकास व गोवा’ या विषयावर सादरीकरण करताना बोलत होते.

Sameer Panditrao

पणजी: पर्वरीत जमीन व सदनिकांचे दर २००५ ते २०२५ या २० वर्षाच्या कालावधीत ३७५ ते ६६६ टक्‍क्यांपर्यंत वाढले आहेत. राज्यात कमी जास्त प्रमाणात हीच स्थिती आहे. त्‍यामुळे जमीन व सदनिकांची खरेदी सर्वसामान्य गोमंतकीयांच्या आवाक्याबाहेर गेल्‍याचे नगररचनाकार अभियंते राहुल देशपांडे यांनी सांगितले.

‘गोमन्तक’च्या अभियांत्रिकी नैपुण्यता पुरस्कार वितरण सोहळ्यात सोमवारी देशपांडे ‘स्वयंपोषक विकास व गोवा’ या विषयावर सादरीकरण करताना बोलत होते.

पूर्वी गावातील घरे कमी पडू लागली की गावालगतच्या शहरी भागात एखादी सदनिका घेतली जात असे. मुलांना चांगल्या शाळेत शिकवण्यासाठी ही सोय म्हणून पाहिली जायची. आता सदनिकांचे दर वाढले आणि गावातच बेकायदा बांधकामे फोफावली, जमिनीवरील अतिक्रमणे वाढली, असे देशपांडे म्‍हणाले.

पणजीत सांता-मोनिका धक्‍क्याजवळ उभारण्यात आलेल्या बहुमजली पार्किंग तळाविषयी देशपांडे म्हणाले, बाहेरगावाहून येणाऱ्यांनी आपल्‍या गाड्या तेथे पार्क कराव्यात आणि पणजीत बसने जावे अशी ती संकल्पना होती. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी ती स्वीकारली होती. ते दिल्लीला गेले आणि ती संकल्पना तेथेच थांबली, असेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

उत्तर ते दक्षिण अशा महामार्गावर सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी मार्गिका आरक्षित ठेवण्याचाही त्यांचा विचार होता. तेही आता होईल असे दिसत नाही.

रस्‍ते तेच, वाहने मात्र भरमसाठ वाढली

शहरात चारचाकी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. रस्ते तेवढेच राहिले, पण गेल्या पाच वर्षांत एक लाख नवी वाहने रस्त्यावर उतरली.

रस्ते हे माणसांसाठी आहेत तर चारचाकी वाहनांसाठी नाहीत.

पार्किंगसाठी सरकारने जागा द्यावी अशी प्रत्येकाची मानसिकता असते. कार हवी तर पार्किंगसुद्धा मालकाचेच असावे असा नियम केला पाहिजे.

बस वाहतुकीसाठी शहर व महामार्गावरील रस्त्यांची एक मार्गिका राखून ठेवली तर वाहतूक कोंडी होणार नाही. लोक बससेवेला प्राधान्य देतील, असे देशपांडे म्‍हणाले.

...तर घरमालकांना एक लाख रुपये दंड ठोठवा

गोव्यात दुसरे घर म्हणून सदनिका घेण्याची फॅशन आली आहे. दोन शयनकक्षांची सदनिका रिकामी ठेवल्यास ५० हजार रुपये दंड तर तीन शयनकक्षांच्या रिकाम्या सदनिकेसाठी १ लाख रुपये दंड आकारण्याची तरतूद करावी, असे देशपांडे यांनी सुचविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

Goa Live Updates: ‘टीसीपी’ भ्रष्टाचारप्रकरणी दक्षता खात्याकडे तक्रार

Codar IIT Project: 'गावात आयआयटी नकोच'! गावडेंचा कोडारवासीयांना पाठिंबा; विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची दिली माहिती

Watch Video: 'मोदी माझे गुरु' आरोग्यमंत्री राणेंचा पंतप्रधानांसाठी खास व्हिडिओ, म्हणाले "मी सामान्य कार्यकर्ता"

SCROLL FOR NEXT