Ragada River Polluted Dainik Gomantak
गोवा

साकोर्डातील रगाडा नदीचे पाणी दूषित; गढूळ पाणीपुरवठ्यामुळे अनेकांना सर्दी, अ‍ॅलर्जी, घशाचा त्रास

गोमन्तक डिजिटल टीम

Ragada River Polluted

साकोर्डा भागातील प्रमुख रगाडा नदीचे पाणी अचानक दूषित होऊन हिरवेगार झाले आहे. याची माहिती साकोर्डावासीयांना मिळताच संतप्त झालेल्या शकडो लोकांनी आज सकाळी पंचायतीवर धडक देऊन पंचायत मंडळाचे लक्ष वेधले.

सरपंच प्रिया खांडेपारकर यांनी त्वरित ग्रामस्थांबरोबर बैठक घेतल्यानंतर प्रदूषित झालेल्या रगाडा नदीच्या पाण्याची देऊळमळ-साकोर्डा येथील पुलाकडे पाहणी केली. रगाडा नदीचे पाणी आटल्याने ते संथपणे वाहत होते. पात्रातील संपूर्ण पाणी गडद हिरवेगार झालेले दिसत होते.

पानसी जलप्रकल्पातून रगाडा नदीचे दुषित पाणी थेट नळाला सोडले जाते. नळाला गढूळ , हिरव्यागार पाण्याचा पुरवठा होत असून पाण्याला मासळीचा वास सुटला आहे, असे एका महिलेने सांगितले. हे पाणी प्याल्याने घशात त्रास होऊ लागला आहे.

तसेच या भागात सर्दीच्या प्रमाणात वाढ झाली आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, परिसरातील लोकांनी घाणीपासून दूर राहण्याचा सल्ला दिलेला आहे. अशा लोकांना "अ‍ॅलर्जी शक्यता असते. होण्याची जास्त

नमुने तपासणीसाठी

आरोग्य खाते, सार्वजनिक बांधकाम खाते व जलस्रोत खाते यांनी नदीच्या पाण्याचे नमुने घेतले असून प्रयोगशळेत पाठवले आहेत. प्रकल्प बंद करून टँकरने गावाला पाणी पुरवठा करण्याची मागणी संतप्त लोकांनी केलेली आहे.

धारबांदोडा पाणी विभागाचे कनिष्ठ अभियंता बाबशेट यावेळी उपस्थित होते. एका प्रकल्पाला दिलेला ना हरकत दाखला मागे घेणार आहे, असे सरपंच प्रिया खांडेपारकर यांनी यावेळी सांगितले.

साकोर्डा येथील रगाडा नदी दूषित झाली आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी सरपंच व पंचायत मंडळाला केली होती. धारबांदोडा येथील पाणी विभागाच्या संबंधित सहाय्यक अभियंत्याना कळवले होते. दूषित पाण्यामुळे अनेक रोग जडण्याची शक्यता असते.

हा संवेदनशील विषय असल्याने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हा विषय ज्यावेळी पंचायतीकडे आला त्यावेळी त्यावर त्वरित कृती करण्याची गरज होती. खबरदारी घ्यावी. अन्यथा आम्हाला पुढील कृती करावी लागेल असे साकोर्डा येथील नीलेश मापारी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT