Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच

मायकल लोबो दिल्लीत: निर्णय मात्र केंद्रीय नेत्यांच्या हाती

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झालेली काँग्रेस अजूनही सावरलेली दिसत नाही. पराभवाचे विचारमंथन आणि चिंतन करण्यासाठी दिल्लीदूत रजनीताई पाटील राज्यात आल्या आहेत. त्यांनी स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपदी कोण? यावर त्यांनीही मौन बाळगले असून यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाच राज्यांतील पराभवानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आदेश काढत पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे घेतले आहेत. तसेच राज्याच्या विधिमंडळातील नेताही अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपद अद्यापही रिक्त आहे. 29 मार्चपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत असल्याने ती पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.

प्रदेशाध्यक्षपदी आमोणकर शक्य

निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस आमदारांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे सध्या नेते पदासाठी चढाओढ लागली असून प्रदेशाध्यक्ष पदासाठी संकल्प आमोणकर, अमित पाटकर, आलेक्स सिक्वेरा यांच्या नावाची चर्चा आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी मायकल लोबो सक्रिय झाले असून ते दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर ज्येष्ठतेच्या आधारे माजी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याकडे हे पद जाण्याची चर्चा कॉंग्रेसच्या गोटात सुरू आहे.

कामतांसाठी रजनीताईंकडे गाऱ्हाणे

काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आणि विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसचे सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार दिगंबर कामत यांनाच द्यावे, अशी मागणी शुक्रवारी मडगावात झालेल्या बैठकीत पक्षाच्या केंद्रीय निरीक्षक रजनी पाटील यांच्याकडे करण्यात आली. यात काही नगरसेवकांचाही समावेश होता. पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यासंबंधीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करू, असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीत मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसचा पराभव झाला असला तरी अनेक जागा किरकोळ मतांमुळे गेल्या आहेत. मात्र, राज्यातील 66 टक्के जनता भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे भाजपविरोधातील असंतोष आम्ही विरोधी पक्ष म्हणून लोकांसमोर मांडत राहू. प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ नेतेपद हे अधिकार पक्षश्रेष्ठींकडे आहेत. प्रदेशाध्यक्ष पद लवकरच केंद्रीय समिती जाहीर करील, तर विधिमंडळातील नेतेपद काँग्रेस आमदार ठरवतील. यासंदर्भातील बैठक केंद्रीय समितीच्या निर्देशानुसार होईल.

- रजनीताई पाटील,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT