गोव्यात उत्सुकता शिगेला; यादी 28 मार्च रोजीच

भाजपमधील ज्येष्ठांना धक्के: उत्तर प्रदेशमध्ये शपथविधीच्या अर्धा तास आधी मंत्र्यांची यादी केली जाहीर
Shyamaprasad Mukherjee Stadium ready for swearing ceremony
Shyamaprasad Mukherjee Stadium ready for swearing ceremonyDainik Gomantak

पणजी: गोवा मंत्रिमंडळाची यादी शपथविधीच्या दिवशी म्हणजे सोमवारी 28 मार्च रोजीच जाहीर होण्याचे संकेत उपलब्ध झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आज तोच प्रयोग भाजप पक्षश्रेष्ठींनी केला आणि शपथविधीच्या केवळ अर्धा तास आधी ही यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू मिळाला व अनेकांना धक्के.

Shyamaprasad Mukherjee Stadium ready for swearing ceremony
सेवेमध्ये निष्काळजीपणा भोवला, पणजीत पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन

उत्तर प्रदेशच्या नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहून डॉ. प्रमोद सावंत रात्री उशिरा गोव्यात परतण्यासाठी निघाले. या शपथविधीला उपस्थित असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांना चर्चा करता आली; परंतु मंत्रिमंडळाचा आकार आणि सदस्यांची नावे याबाबत मात्र सारेच अनभिज्ञ आहेत, याचा अनुभव त्यांना आला. उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ नेत्यांना ज्याप्रकारे ऐनवेळी धक्के देत डच्चू देण्यात आला, तो प्रकारही शपथविधी सोहळ्यात अनेकांसाठी ‘सस्पेन्स’ होता.

सूत्रांच्या मते, गृहमंत्री अमित शहा हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून ही यादी बनवत आहेत. फडणवीस व पक्षाचे संघटनप्रमुख बी. एल. संतोष यांनी यापूर्वीच निवडणुकीसंदर्भातील आपले अहवाल अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सादर केले आहेत. मंत्रिमंडळाची संभाव्य यादी बनवताना 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचाही आलेख डोळ्यांसमोर ठेवला जाणार आहे.

संभाव्य यादीतील सदस्यही अंधारात

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी दुपारी चार वाजता झाला. परंतु मंत्रिमंडळाची यादी साडेतीन वाजता प्रसार माध्यमांना देण्यात आली. त्यामुळे आघाडीच्या वृत्तवाहिन्यासुद्धा तीन वाजेपर्यंत मंत्रिमंडळातील संभाव्य यादीबद्दल शक्यताच व्यक्त करीत होत्या. या यादीमध्ये अनेक ज्येष्ठांना डावलले असून संभाव्य यादीतील सदस्यांनाही अंधारात ठेवले होते. हा प्रत्यक्ष अनुभव काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही घेता आला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षासाठी चुरस

विधानसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झालेली काँग्रेस अजूनही सावरलेली दिसत नाही. पराभवाचे विचारमंथन आणि चिंतन करण्यासाठी दिल्लीदूत रजनीताई पाटील गोव्यात आल्या आहेत. त्यांनी स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपदी कोण? यावर त्यांनीही मौन बाळगले असून यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Shyamaprasad Mukherjee Stadium ready for swearing ceremony
'गोव्यात पेट्रोल-डिझेलचे दर 80 रुपयांवर आणा'

लॉबिंग बंद

मतमोजणीनंतर भाजपच्या आमदारांमध्ये सुरू असलेले लॉबिंगही सध्या पूर्णतः बंद झाले आहे. त्यामुळे कुणाला घ्यावे किंवा नको, यासंदर्भात सुरू असलेल्या अफवाही बंद झाल्या आहेत. ताज विवांता हॉटेलमध्ये बसून मंत्रिमंडळाच्या रचनेसंदर्भात लॉबिंग करणारे आमदारही सध्या विजनवासात गेले आहेत.

मंत्रिमंडळाची यादी बनवताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि संघटनमंत्री सतीश धोंड यांच्याशी सल्लामसलत केली जाईल.

गोव्याची यादी फडणवीसांच्या पेटाऱ्यात: शपथविधीदिवशीच गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस दिल्लीहून यादी घेऊन राज्यात दाखल होतील, अशी शक्यता आहे. त्यामध्ये केवळ मंत्र्यांची नावे तसेच त्यांची खातीही नमूद केलेली असतील, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सूत्रांच्या मते, मंत्र्यांबरोबर ज्या आमदारांना महामंडळे दिली जातील, त्यांचीही यादी फडणवीस घेऊन येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com