Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठात पीएचडी परीक्षा वादाच्या भोवऱ्यात! संशोधन प्रबंधाच्या निकषांवर सवाल; माजी प्राध्यापकांनी कुलसचिवांना विचारला जाब

Goa University PHD Controversy: गोवा विद्यापीठात पृथ्वी विज्ञान विषयातील एका पीएचडी खुल्या तोंडी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर संशोधन प्रबंधांच्या सारांश सादरीकरणाच्या निकषांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोवा विद्यापीठात पृथ्वी विज्ञान विषयातील एका पीएचडी खुल्या तोंडी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर संशोधन प्रबंधांच्या सारांश सादरीकरणाच्या निकषांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित उमेदवाराच्या खुल्या तोंडी परीक्षेपूर्वी विद्यापीठाने प्रसारित केलेला सारांश अवघ्या सुमारे ८०० शब्दांचा असून, त्यामध्ये संशोधनाची व्याप्ती, नमुन्यांची संख्या, वापरलेली विश्लेषणात्मक साधने, सांख्यिकीय माहिती, संशोधनातील मूळ योगदान, प्रकाशित संशोधनपत्रे किंवा निष्कर्षांचे परिमाणात्मक स्वरूप यांचा पुरेसा तपशील नसल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

विशेष म्हणजे, हा प्रबंध अंटार्क्टिकातील मायक्रोमेटिओराइट्स आणि मध्य हिंदी महासागरातील कॉस्मिक स्फेर्युल्स यांसारख्या अत्यंत विशेष आणि जागतिक महत्त्वाच्या विषयाशी संबंधित आहे. अशा संशोधनासाठी अधिक विस्तृत आणि माहितीपूर्ण सारांश अपेक्षित असताना केवळ संक्षिप्त वर्णनात्मक मजकूर प्रसारित करण्यात आल्याने संशोधनाच्या मूल्यमापन प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही माजी प्राध्यापक आणि संशोधन मार्गदर्शकांनी विद्यापीठ प्रशासन, कुलगुरू कार्यालय आणि कुलसचिव कार्यालय यांचे लक्ष या बाबीकडे वेधून अधिक सविस्तर सारांश किंवा विस्तारित संशोधन-सिनॉप्सिस प्रसारित करण्याची मागणी केली होती. मात्र, खुल्या तोंडी परीक्षेच्या तारखेपर्यंत कोणताही सुधारित किंवा विस्तारित सारांश प्रसारित झालेला नसल्याचे समजते.

या मागण्यांची दखल घेण्यात आली का, त्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली अथवा मूळ सारांशच पुरेसा मानण्यात आला का, याबाबत विद्यापीठाकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. याउलट, गोवा विद्यापीठाशी संलग्न इतर संशोधन केंद्रांमध्ये पीएचडी प्रबंध सादर करण्याच्या अंतिम टप्प्यावर अनेकदा ३० ते ४० पानी विस्तृत सिनॉप्सिस सादर केली जाते.

अशा दस्तऐवजांमध्ये संशोधन प्रश्न, उद्दिष्टे, गृहीते, नमुना निवड, संशोधन पद्धती, सांख्यिकीय विश्लेषण, नकाशे, तक्ते, निष्कर्ष आणि संशोधनाचे अपेक्षित योगदान यांचा सविस्तर आढावा दिलेला असतो. त्यामुळे विविध विभाग आणि संशोधन केंद्रांमध्ये खुल्या तोंडी परीक्षेपूर्वी प्रसारित होणाऱ्या दस्तऐवजांसाठी समान निकष लागू आहेत का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT