Mapusa News Food Court: ऑक्टोबरपूर्वी म्हापशात उभे राहणार अत्याधुनिक 'फूड कोर्ट'! खवय्यांसाठी पालिका प्रशासनाची मोठी भेट; कसा असणार नवा लूक?

Mapusa Food Court Project: परिसरातील विद्यमान स्टॉल्सच्या जागी सर्व सुविधांनी युक्त असे आधुनिक फूड कोर्ट उभारण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
Mapusa Food Court Project
MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: अलंकार थिएटर परिसरातील खाद्यपदार्थ विक्री व्यवसायाला आधुनिक आणि शिस्तबद्ध स्वरूप देण्यासाठी म्हापसा पालिका, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि स्टॉलधारक विक्रेते यांनी एकत्रित पुढाकार घेतला आहे.

या परिसरातील विद्यमान स्टॉल्सच्या जागी सर्व सुविधांनी युक्त असे आधुनिक फूड कोर्ट उभारण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ऑक्टोबरपूर्वी हे फूड कोर्ट कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. आमदार जोशुआ डिसोझा आणि म्हापसा पालिकेच्या प्रशासक फिओना कार्दोझो यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

Mapusa Food Court Project
Mirabag: '2 दिवसात निर्णय द्या, अन्यथा आंदोलन तीव्र'! मीराबागवासीयांचा निर्धार; प्रेझेंटेशनवेळी पोलिस छावणीचे स्वरूप VIDEO

नवीन फूड कोर्टासाठी संपूर्ण परिसराचे काँक्रिटीकरण करून एकसमान प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. यामुळे परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक बनेल. या कामासाठी काही काळ स्टॉल्स बंद ठेवावे लागणार असून त्याचे वेळापत्रक पालिका लवकरच जाहीर करणार आहे.

नवीन व्यवस्थेनुसार मुख्य परिसरात कच्चे चिकन कापण्यास परवानगी राहणार नाही. केवळ प्रक्रिया केलेले अथवा शिजविण्यासाठी तयार साहित्यच आणण्याची मुभा असेल. तसेच सर्व विक्रेत्यांनी आवश्यक परवाने प्राप्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रलंबित परवाने तातडीने पूर्ण करून एफडीएकडे सादर करण्याचे आश्वासन विक्रेत्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com