Quepem Dainik Gomantak
गोवा

Quepem: बाळ्ळी येथील अकरा आस्थापनांवर कारवाई, दंड वसूल; 'कोटपा' अंतर्गत धडक मोहीम

COTPA Raid in Balli Quepem: केपे तालुक्यातील बाळ्ळी परिसरात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायद्याचे (कोटपा) उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने सोमवारी (३० मार्च) धडक मोहीम राबवली.

Sameer Amunekar

मडगाव: केपे तालुक्यातील बाळ्ळी परिसरात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायद्याचे (कोटपा) उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने सोमवारी (३० मार्च) धडक मोहीम राबवली. या कारवाईत एकूण ११ आस्थापनांवर कारवाई करून त्यांच्याकडून एकूण २,२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळ्ळी येथील विविध सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये ‘कोटपा’ कायद्याच्या कलम ४ मधील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन न करणाऱ्या या ११ आस्थापनांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

कारवाई सुरूच राहणार

गोवा कॅनच्या सचिव लॉन फर्नांडिस यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध करणे आणि कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांवर वचक बसवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. केवळ दंड वसूल करणे हा हेतू नसून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. भविष्यातही अशा प्रकारची कडक कारवाई सातत्याने सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT