Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Pre Monsoon House Repairs Bicholim: मॉन्सूनची चाहूल लागल्याने डिचोलीत सध्या गावोगावी पावसाळापूर्व घरांची शाकारणी आदी पावसाळापूर्व कामांची गडबड सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 Pre Monsoon House Repairs Bicholim
Pre Monsoon House Repairs BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: मॉन्सूनची चाहूल लागल्याने डिचोलीत सध्या गावोगावी पावसाळापूर्व घरांची शाकारणी आदी पावसाळापूर्व कामांची गडबड सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या प्लास्टिकसह पत्रे आदी सामानाची खरेदीही जोरात सुरु आहे. दुसऱ्याबाजूने अधूनमधून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे त्यातच मजूर महाग झाल्याने पावसाळापूर्व कामे करताना जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

दरवर्षी पावसाळ्याची चाहूल लागली, की शहरासह गावोगावी लोक घरे शाकारणी, प्लास्टिकची आच्छादने टाकणे आदी पावसाळापूर्व कामांना हात घालतात. काहीजण मोसमी पावसाळा सुरु होण्यापूर्वी ही कामे आटोपूनही घेतात. सध्या डिचोली शहरासह काही ग्रामीण भागात अजूनही पावसाळापूर्व कामे सुरु असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्याबाजूने या कामांसाठी मजूरही भाव खाऊ लागले आहेत.घरे शाकारणी आदी पावसाळापूर्व कामे करण्यासाठी सध्या मजूर दौड हजार रुपये मजुरी आकारतात, एका बाजूने मजुरीत वाढ आणि दुसऱ्याबाजुने मजुर मिळत नसल्याने काही लोकांची कामे अडून राहिली आहेत.

 Pre Monsoon House Repairs Bicholim
Goa Pre-Monsoon Rain: वरुणराजा रुसला! पावसाची सरासरी घटली, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण; उत्तर गोव्याची बिकट अवस्था

'आयडीसी'त उत्पादन !

डिचोलीतील 'आयडीसी'त प्लास्टिक उत्पादन करणारे चारहून अधिक कारखाने आहेत. त्याठिकाणी घाऊक दराने आणि चांगल्या प्रतीचे प्लास्टिक मिळत असल्यामुळे बहुतेकजणांची पावले आयडीसीच्या दिशेने वळतात. दीडशे, २२० आणि ३०० रुपये किलो असे प्लास्टिक विकण्यात येत आहे.

प्लास्टिकला मागणी !

पावसाच्या झडीपासून संरक्षण मिळण्यासाठी बहूतेक सर्वजण घरादारांना प्लास्टिकची आच्छादने लावतात. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांपासून प्लास्टिकला मागणी वाढली आहे. डिचोलीतही सध्या प्लास्टिक खरेदी जोरात सुरु आहे. डिचोलीसह आजूबाजूच्या परिसरातील लोक बाजारातून प्लास्टिक खरेदी करण्याऐवजी प्लास्टिक उत्पादन कारखान्यात जावून प्लास्टिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com